राज्य

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ऑटो रिक्षा सजावट स्पर्धेचे नाशिक येथे 9 फेब्रुवारीला आयोजन

संजीव भांबोरे
नाशिक (ऑल इंडिया प्रतिनिधी) बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 9 फेब्रुवारी 2023 ला हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान क्लब त्र्यंबक रोड येथे सकाळी ११.३० वाजता ही रिक्षा सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत नंतर लगेच बक्षीस वितरण करण्यात येणार आहे .या वाढदिवसानिमित्त नाशिककर रिक्षा चालकांच्या रिक्षांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने ऑटो रिक्षा सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे .रिक्षाची आकर्षक सजावट चालकांचा उत्तम पेहराव याची परिक्षकाकडून करून पाहणी करण्यात येणार आहे .स्पर्धेत विनामूल्य सहभाग घेता येणार आहे .या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या 21000 रुपये, द्वितीय बक्षीस 11000 रुपये, तृतीय बक्षीस 7000 रुपये, चतुर्थ बक्षीस 5000 रुपये ,पाचवे २००० रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सर्वच स्पर्धकांचे एक लाखांचे विमा संरक्षण मोफत काढण्यात येणार आहे .त्याकरिता आधार कार्ड व पॅन कार्ड आवश्यक आहे .या स्पर्धेत जास्तीत जास्त रिक्षा चालक मालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रवीण (बंटी) तिदमे नाशिक शहर महानगरपालिका प्रमुख बाळासाहेबांची शिवसेना यांनी केलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button