राज्य
जागतिक स्पर्धेत टिकून राहयचे असल्यास आत्मविश्वास वाढविला पाहिजे


कोंढाळी-प्रतिनिधी दुर्गाप्रसाद पांडे
आगामी युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित असेल, ज्या मध्ये टेली-एज्युकेशन, टेली-मेडिसिन आधारित असेल. आता आपण एका नव्या युगात प्रवेश करत आहोत. ग्रामीण भागातही हुशार विद्यार्थ्यांची कमतरता नाही. त्यामुळे जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आत्मविश्वास वाढवावा लागेल.असे मार्गदर्शन ज्येष्ठ संपादक श्रीमंत माने यांनी लखोटिया भुतडा शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, लोणकरण राठी प्राथमिक शाळा, व लखोटिया भुतडा हायस्कूल (सी. बी एस ईअंतर्गत) यांचे 23-24 आणि 25 जानेवारी रोजी स्नेह संमेलनाचे आयोजन केले आहे. या स्नेह संमेलनाचेआज 23जानेवारी रोजीउद्घाटन प्रसंगी संस्थेतील सेवानिवृत्त शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या संयुक्त स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष राजेश राठी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ संपादक श्रीमंत माने व प्रमुख पाहुणे रामटेक लोकसभा मतदार संघाचे खासदार कृपाल तुमाने व संस्थेचे सचिव डॉ.शाम सुंदर लद्दड, उपाध्यक्ष रेखा राठी, संचालक राहुल लद्दड,पुष्कराज अग्रवाल आणि सुनील लद्धड यांच्या उपस्थितीत
आयोजित रंगारंग शैक्षणिक महोत्सवात माजी प्राचार्य ज्ञानेश्वर केवटे यांच्यासह उपप्राचार्य बबनराव तागडे, अशोक वानखेडे, माधुरीताई घाटे, शालिकराव खोब्रागडे, विनायकराव शेळके, व विजय दुपार आदी चा सेवानिवृत्ती सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी क्रीडा, विविध राज्यांचे सांस्कृतिक नृत्य, विज्ञान प्रदर्शनी, चित्रकला, एन सी सी व स्काऊट गाईड चे शिस्त बद्ध पथ संचलन आणि विविध शैक्षणिक स्पर्धांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, तहसील आणि खासदार महोत्सव इत्यादी स्पर्धांमध्ये विजेत्यांना
कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य गणेशराव शेंबेकर, प्राचार्य- ज्योती राऊत, सी.बी.एस. ई.आणि प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना मानमोडे यांच्या उपस्थितीत पुरस्कार देण्यात आला. लखोटिया भुतडा हायस्कूल या तिन्ही विभागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक, सांस्कृतिक, विज्ञान कामगिरी व क्रीडा स्पर्धा या तिन्ही विभागांच्या कार्याबद्दल उपस्थित पाहुणे व पालकांसमोर संस्थेचे संचालक मंडळ व उपस्थितीतांनी इयत्ता दहावी व बारावीचे गुणवंत विद्यार्थ्यांचे गुण गौरव करण्यात आला.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव व संचालकांच्या हस्ते संविधान ज्योती व ज्योती या हस्तलिखित पुस्तकाचे विमोचन करण्यात आले, खासदार कृपाल तुमाने यांनी इयत्ता 10 वी व 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा क्रीडा पुरस्कार विजेत्यांचा सत्कार करून सत्कार करून क्रीडा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव करत प्रोत्साहन दिले. व विद्यार्थ्यांकरिता अकरा लाखांचा अत्याधुनिक जिम आणि डिजिटल लॅब. करिता विकास निधी मंजूर केला. यावेळी कोंढाळीचे सरपंच केशवराव धुर्वे, उपसरपंच स्वप्नील व्यास सीबीएसईच्या मुख्याध्यापिका डॉ.ज्योती राऊत, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना मानमोडे, उपप्राचार्या शालिनी इंगळे, पर्यवेक्षक सुधीर बुटे, माजी प्राचार्य कुहीटे, भास्कर राव पराड निजामिया हायस्कूल चे मुख्याध्यापक शाहीद सर,पालक संघटनेचे अध्यक्ष जयंतराव वंजारी,तसेच माजी शिक्षक होते.
संचालन डॉ.निरंजन अंजनकर यांनी केले तर आभार प्रा.कैलास थूल यांनी मानले




