अड्याळ पोलीस स्टेशन मार्फत सडक सुरक्षा -जीवन रक्षा रॅलीचे आयोजन

संजीव भांबोरे
भंडारा ( ऑल इंडिया प्रतिनिधी) पोलीस स्टेशन अड्याळ सडक सुरक्षा जीवन रक्षा 33 वे महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2023 रॅलीचे आयोजन 14 जानेवारीला रोज शनिवारला सकाळी ९ वाजता अड्याळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधीर बोरकुटे यांचे नेतृत्वात शाळेतील विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली . ही रॅली गावातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली. या रॅलीमध्ये दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट चा वापर करावा ,
चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्टच्या वापर करावा, वेग मर्यादा पेक्षा अतिवेगात वाहन चालवू नये,

मध्यप्राशन करून वाहन चालवू नये ,वाहन चालवताना लेन कटिंग करू नये , पादचाऱ्यांनी नेहमी फुटपाथचा वापर करावा , वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर करू नये, रस्त्यावर धोकादायक वाहन चालवू नये झेब्रा क्रॉसिंगचा ठिकाणाहून रस्ता ओलांडू नये ,वाहन चालविताना पादचाऱ्यांना प्राधान्य द्यावे,
असे आवाहन अड्याळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधीर बोरकुटे यांनी केलेले आहे.




