अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई प्रदेशाध्यक्षपदी शुभांगी गादेगावकर यांचे नियुक्ती

मुंबई (संजीव भांबोरे,आँल ईन्डीया प्रतिनिधी, ★पोलीस कि आवाज★)अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई प्रदेशाध्यक्षपदी सुप्रसिद्ध कादंबिकार ,कवयित्री, लेखिका ,डॉ. सौ शुभांगी गणेश गादेगावकर यांची नियुक्ती अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आनंदकुमार शेंडे यांनी लेखी पत्रकाद्वारे केलेली आहे. त्यांचे शिक्षण एच एस सी , डीएड, एम ए इतिहास ,एम ए मराठी ,बीएड, नेट सेट केली असून त्यांचे अपूर्व रंगावली ,(रांगोळी) 2010 , आशेची पालवी (कादंबरी )2018 ,चूक कोणाची( कादंबरी )2018 , बण्याच्या गमतीजमती (बालकथासंग्रह) 2018, सुनामी कवितासंग्रह 2021 ,साहित्य प्रकाशित झालेले आहे .त्यांच्या नियुक्तीमुळे अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य चळवळ मजबूत करण्यात मोलाच्या वाटा राहणार आहे .त्यांच्या नियुक्तीचा अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदेच्या अनेक कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे .त्याचप्रमाणे
अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय मीडिया प्रमुख संजीव भांबोरे व राजेश ऊके , मुख्य संपादक ★पोलीस कि आवाज न्युज★ यांनी सुद्धा त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.




