भंडारा येथे इलेक्ट्रो होमिओपॅथिक कॉन्फरन्स दोन दिवसीय शिबिर कार्यक्रम संपन्न

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) येथे पोलीस बहुउद्देशीय सांस्कृतिक सभागृह जिल्हा पोलीस मुख्यालय येथे इलेक्ट्रो होमिओपॅथिक दोन दिवसीय
कॉन्फरन्स निवासी शिबिराचे आयोजन दिनांक 24 व 25 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. या मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रो होमिओपॅथिक शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ .अजित सिंग पंजाब ओ एम ई उपस्थित होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रो होमिओपॅथिक संघटनेचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष डॉ. सतीश जगदाळे उपस्थित होते .यावेळी डॉ. अजित सिंग यांनी इलेक्ट्रो होमिओपॅथिक चिकित्सा पद्धती नेमकी काय आहे यावर मार्गदर्शन केले .त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. सतीश जगदाळे यांनी इलेक्ट्रो होमिओपॅथिक चिकित्सा पद्धती शासन मान्यता मिळण्यासाठी काय हालचाली सुरू आहेत यावर सविस्तर माहिती दिली. यावेळी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील इलेक्ट्रो होमिओपॅथिक डॉ. प्रामुख्याने उपस्थित होते .हे शिबिर यशस्वी करण्याकरता भंडारा जिल्ह्यातील डॉ. रमेश दृगकर भंडारा जिल्हाध्यक्ष, डॉ. अनिल वंजारी कार्यकारी अध्यक्ष ,डॉ शशिकांत तांदूळकर जिल्हा उपाध्यक्ष डॉ मनोज कळंबे जिल्हा सचिव डॉआनंद बोकडे जिल्हा सहसचिव डॉ. योगेश वैद्य जिल्हा कोषाध्यक्ष ,डॉ.भूपेंद्र वानखेडे डॉ.भानुदास कापगते, डॉ. विश्वजीत थुलकर, डॉ. जितेंद्र तुरकर ,डॉ. उमराव ठाकरे ,डॉ. रणजीत मेश्राम ,डॉ. खुशाल मोहरकर, डॉ.कृष्णा चिंचखेडे, डॉ. लक्ष्मीकांत बुराडे डॉ संजय ठाकरे ,डॉ .मिलिंद प्रधान, डॉ. शरद पुष्पतोडे ,डॉ .नोकलाल पटले, डॉ .चित्तरंजन मते ,डॉ .संजय मेहंदळे यांनी सहकार्य केले.




