गणेश मंदिर चौकात फार मोठी जीवितहानीची घटना व्हायला कोणत्याही क्षणाची केवळ वाट..!
संजीव भांबोरे
भंडारा : (जिल्हा प्रतिनिधी) साकोली गणेश मंदिर चौक मुख्य रस्त्यावरील उच्च व्होल्टेज कर्षण तारांवर हे जीर्ण पूर्ण:त झूकलेले धोकादायक झाड कोसळून वरील पाचही विद्युत खांबांना विजप्रवाह तारे तूटून भयंकर शॉट सर्कीटने व रोडवर जिवंत तार पडून येथे किती नागरीकांचे व बालकांचे बळी जातील.आज १७ नोव्हेंबर दू. २:२० ला महावितरणचे कर्मचारी येऊन पाहून गेले सांगितले की ,जर झाड मुख्य हेड उच्च प्रवाह तारांवर कोसळेल तर तारांच्या ओढताणेने विद्यृत खांबही कोसळू शकतो व त्याने जिल्हा परिषद शाळेसमोरीलही उभ्या खांबाला ताण पडून शॉट सर्किटने रोडवरच जाणा-या जनतेसोबत मोठी जिवितहानी होऊ शकते..! हे नक्की. या रोडवरून नमाज अदा करण्यासाठी जाणारे जामा मस्जिद रोडावरील जाणारी जनता.. शाळेत जाणारी व ये जा करणारी २२५ लहान बालके…तलाव वार्ड, लाखांदूर रोड व अन्य प्रभागातील श्री गणपती मंदिरात दररोज दर्शनासाठी जाणारे महिला पुरूष व लहान बालके…. नेहमीच ( सकाळी ते रात्री पर्यंत ) मेडीकल, किराणा, हॉस्पिटल, व अन्य आवश्यक सेवेसाठी जाणारी महिला पुरूष मुले, वयोवृद्ध नागरिक यांना या अतिभयंकर व आता संवेदनशील झालेल्या या घटनास्थळी सकाळी ते रात्री पर्यंत विद्युत तारांवर ते जिवघेणे झाड कोसळून मोठी जिवितहानी कोणत्याही क्षणी… न सांगून येणा-या कोणत्याही वेळी अनेकांना आपले प्राण गमवावे लागेल..! व याला सर्वस्वी जबाबदार कोण..? जबाबदार राहील ज्याने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करून छोटी गोष्ट म्हणून टाळले त्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. याबाबत अनेकदा
तक्रार विलास ( बंडू ) कापगते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश कोवे, उपाध्यक्ष रिना चचाने, सदस्य आशिष चेडगे, माजी नगरसेवक हेमंत भारद्वाज, आशिष कापगते, उदाराम कापगते, विनायक तिडके व समस्त गणेश मंदिर चौक, गणेश वार्ड निवासी, जामा मस्जिद साकोलीचे सर्व सदस्य, जिल्हा परिषद केंद्रीय शाळेचे शिक्षकवृंद, केली परंतु काहीच उपयोग झालेला नाही.





