जिल्हा

निमगाव येथे दिवाळीच्या शुभ पर्वावर आमदंगल (कुस्ती) स्पर्धेत 40 स्पर्धकांनी घेतला हिस्सा

मुली ठरल्या आम दंगल स्पर्धक आकर्षण केंद्र

संजीव भांबोरे/राजेश ऊके (मुख्य संपादक, पोलीस कि आवाज न्युज)
भंडारा (ऑल इंडिया प्रतिनिधी) तालुक्यातील पहेला येथून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या निमगाव येथे आज 25 नोव्हेंबर 2022 ला सायंकाळी 4 वाजता आमदंगल कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते दीपक वानखेडे यांनी केले .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अड्याळ येथील ठाणेदार सुधीर बोरकुटे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच सिला राऊत, तंटामुक्ती समिती अध्यक्ष कृष्णाजी चवळे, रामभाऊ भोयर ,सुभाष चुधरी, सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे, बालू चवळे उपसरपंच ,यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. आमदंगलच्या कुस्ती स्पर्धेचा लाभ घेण्याकरता यावेळी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या स्पर्धेत 40 स्पर्धकांनी भाग घेतला होता .या आमदंगलच्या स्पर्धेत मुलींनी सुद्धा हिस्सा घेतला होता विजयाच्या मानकरी सुद्धा ठरल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button