रोशनी लोकसंचालित साधन केंद्र जवळा बाजार ची बारावी सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

संजीव भांबोरे
हिंगोली (ऑल इंडिया प्रतिनिधी) महिला आर्थिक विकास महामंडळ हिंगोली द्वारा संचलित रोशनी लोकसंचालित साधन केंद्र जवळा बाजार ची बारावी सर्वसाधारण सभा उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाकरिता महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी विलास जगताप , लेखाधिकारी संकेत महाजन ,गजानन इंगळे ,पंतप्रधान अन्नसुरक्षा योजना चे जयप्रकाश सूर्यवंशी , स्मार्ट प्रोजेक्टचे दादासाहेब खाडे ,आरसीटीच्या प्रशिक्षक संगीतामुळे मॅडम ,सामाजिक कार्यकर्ता आदित्य आहेर ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र बार्टीचे समतादूत आळणे मिलिंद ,अँडव्होकेट रहीम कुरेशी , .वैशाली सूर्यवंशी रोशनी लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्षा सुनीता शेळके, रोशनी लोकसंचालित साधन केंद्राच्या सचिव श्रीमती संताबाई जाधव, महिला बालकल्याण चे सचिन , सर्व गाव प्रतिनिधी महिला यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमांमध्ये गरीब महिलांनी काबाडकष्ट करून आपल्या मुला-मुलींना उच्च शिक्षण दिले त्याबद्दल त्यांच्या थोर आईचा सीएमआरसीच्या वतीने सत्कार करण्यात आला .तसेच तेजश्री फायनान्शियल सर्व्हिसेस योजनेमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या संताबाई जाधव व देव बाई जाधव यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ट सीआरपी म्हणून विजया कटारे व अनिता कीर्तने यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ट बचत गट बसवेश्वर महिला बचत गट शिरड शहापूर यांचा सत्कार करण्यात आला .उत्कृष्ट सहयोगी म्हणून मंगल नरवाडे मीरा वेडे कांचन थोरात प्रभावती कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाकरिता सूत्रसंचालन स्वप्नपूर्ती लोकसंचलित साधन केंद्राचे व्यवस्थापक सुनील चव्हाण यांनी केले. लोकसंचालित साधन केंद्र औंढा नागनाथ चे व्यवस्थापक माननीय विलास पंडित, लोकसंचालित साधन केंद्र वसमत चे व्यवस्थापक बालाजी मुळे, रोशनी लोकसंचालित साधन केंद्र जवळा बाजार चे लेखापाल संकेत दोडल , व सहयोगिनी कार्यकारिणी महिला व बचत गटातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. या कार्यक्रमाकरिता सहयोगिनी मीरा वेडे यांनी अतिशय परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोशनी लोकसंचलित साधन केंद्राचे व्यवस्थापक वंदना पांडवी यांनी केले तर आभार मंगल नरवाडे यांनी मानले.
