अड्याळ येथे आज कौमी एकता सद्भावना संसद

भंडारा पोलीस अधीक्षक लोहित मतानी करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

मा.श्री.राजेश ऊके(मुख्य संपादक★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क)अड्याळ: ईद ए मिलादच्या पर्वावर रविवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता अड्याळ येथील गुजरी चौक स्थित उत्तर बुनियादी शाळेच्या आवारात जमियत उलमा ए हिंद पवनी तालुकाध्यक्ष तथा मदिना मस्जिद अध्यक्ष सोहेल खान यांच्यातर्फे कौमी एकता सद्भावना संसदचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी उपस्थित राहतील. सर्व धर्मातील प्रमुख व शिक्षक उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी आयोजकांनी दिली आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रमुख मार्गदर्शक लोहित मतानी राहणार आहेत.
यावेळी मंचवर हनुमंत देवस्थान, चर्च, बुद्ध विहार, जामा तथा मदिना मस्जिद, परमात्मा एक सेवक, बजरंग दल, भजन मंडळ येथील प्रमुख तथा फिनिक्स, हिवरकर अकादमीचे तालुक्यातील अधिकारी व पदाधिकारी तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा स्वरक्षण टीमच्या उपस्थितीत सर्वधर्म समभावचा नारा दिला आहे.





