जिल्हा

यशकल्याणी सेवाभाव संस्थेच्या वतीने मा श्री गणेश भाऊ करे पाटील यांच्या हस्ते आशाताई चांदणे यांचा सन्मान.


करमाळा प्रतिनिधी :- प्रमिला जाधव. करमाळा येथे यशकल्याणी सेवाभाव संस्थेच्या वतीने मा श्री गणेश भाऊ करे पाटील यांनी सौ. आशाताई चांदणे यांना अंगणवाडी उत्कृष्ट कार्य पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या करमाळा तालुका टीमच्या वतीने मा. गणेश भाऊ करे पाटील यांच्या हस्ते सन्मानित केले, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.प्रमिला जाधव यांनी केले, यावेळी गणेश भाऊ करे पाटील यांनी अंगणवाडी चे कार्य, तसेच त्यांच्या जबाबदारी, कुपोषण बालके,, अशा अनेक गोष्टींचा उल्लेख करुन अंगणवाडी क्षेत्रात काम करणाऱ्या सेविकांचा नेहमी च गौरव करण्यात येतो असे ते म्हणाले,तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघांचे कार्य हे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले, त्यानंतर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या जिल्हा अध्यक्षा आशाताई चांदणे यांनी अंगणवाडी उत्कृष्ट कार्य, तसेच पत्रकार सेवा संघाच्या कार्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले, त्यानंतर तालुका अध्यक्ष श्री बाळासाहेब भिसे यांनी ही आपल्या मनोगतातुन जिल्हा अध्यक्षा मा. आशाताई चांदणे यांचे कार्य समाजात उल्लेखनीय आहे असे सांगून संघाच्या वतीने शुभेच्छा दिल्या, त्यानंतर सचिन नवले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले, त्यानंतर अंगणवाडी उत्कृष्ट कार्य, तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे, व सामाजिक कार्य पाहुन मा. श्री. गणेश भाऊ करे पाटील यांनी आशाताई चांदणे यांना यशकल्याणी सेवाभाव संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र व मेडल देवुन सन्मानित केले, त्यानंतर श्री. प्रदिप पवार तालुका सचिव यांनी आभार मानले, यावेळी उपस्थित मा. गणेश भाऊ करे पाटील, सोलापूर जिल्हा अध्यक्षा सौ. आशाताई चांदणे, जिल्हा सचिव प्रमिला जाधव, करमाळा तालुका अध्यक्ष श्री. बाळासाहेब भिसे, करमाळा तालुका सचिव श्री. प्रदिप पवार, जेऊर शहर अध्यक्ष श्री आबासाहेब झिंजाडे, करमाळा तालुका संपर्क प्रमुख श्री. प्रमोद खराडे, सदस्य माधुरीताई कुंभार, सदस्य ज्योती माने, सदस्य श्री. संभाजी शिंदे सदस्य श्री. संजय चांदणे.सदस्य श्री.सचिन नवले.

प्रमिला जाधव ,संवाददाता ★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button