भुयार परिसरामध्ये रोज होतात वाघाचे दर्शन, वाघाचा बंदोबस्त करा- मेघराज जोगवे यांची मागण



संजीव भांबोरे
भंडारा (ऑल इंडिया प्रतिनिधी) पवनी तालुक्यातील भुयार ,मेढेंगाव,खापरी,ठाणेगाव,वायगाव,निष्ठी , गावात वाघाने धुमाकुळ घातला आहे असून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वायगाव येथे चार दिवसा अगोदर वाघाने गाय बैलांची शिकार केली होती.
गावालगतच्या शेतशिवारात वाघाचे पाऊलखुणा आढळून आल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी मेघराज जोगवे जवान यांनी केलेली आहे
मागील आठ दिवसात खापरी, ठाणेगाव ,भुयार,
या परिसरात वाघाचे पगमार्क आढळून आले होते.
मेंढेगाव रोड, खापरी रोड, निष्टी रोड आज दोन वेळा वाघाचे दर्शन झाल्याने
नागरिकांतमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
हा परिसर जंगल व्याप्त असून एका भागाला उमरेड करांडला अभयारण्य असुन
येथील सगळे प्राणी प्रादेशिक क्षेत्रामध्ये आलेले आहेत.
भुयार परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून वाघाचे संचार
सुरू आहे.
शेतकऱ्यासह पशुपालनात तसेच नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने लवकरात लवकर वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी मेघराज जोगवे जवान
छावा संग्राम पवनी तालुका महामंत्री यांनी केले आहे.




