जिल्हा

चित्ता प्राणाच्या प्रवेशासंबंधी आणि पर्यावरण संवर्धनासंबंधी मार्गदर्शन

अड्याळ येथे सुजाता कन्या विद्यालय येथे 14-09-2022 बुधवारला ‘चित्ता या विषयावर भारतातील प्रवेशासंबंधी तसेच पर्यावरणाचे संवर्धना – संबंधी माहितीविषयक मार्गदर्शन शिबीर राबविण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी अड्याळ वन परिक्षेत्र अधिकारी घनश्याम ठोंबरे , विनोद पंचभाई, सोनू निवाते, आकाश कवाडे – वनरक्षक अड्याळ राउंड ऑफिसर, व तिरी ‘तसेच धिरज तलमले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिक कु. भारती गिरडकर अध्यक्ष म्हणून उपस्थित प्रमुख अतिथींचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. चित्ता प्राण्याविषयी माहिती सांगताना श्री. ठोंबरे यांनी चित्ता प्राणाच्या अधिवासाविषयी त्याच्या प्रजातीविषयीची माहिती दिली. मध्यप्रदेशातील राष्ट्रीय उद्यानात चित्ता प्राणी नव्याने प्रवेशित होणार असल्याची माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणामध्ये गिरडकर मॅडम यांनी जगातील चित्त्यांची संख्या, चित्त्याचे वजन, वयोमर्यादा, वेग, अधिवास इ. ची माहिती ‘दिली. सदरची माहिती देतांना प्रोजेक्टरद्वारे व्हिडीओ चा वापर करण्यात आला. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग तसेच शालेय विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे संचालन कू. धुरंधर मॅडम तर आभार प्रदर्शन कु. बोन्डे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नागपुरे, पचारे कु. कोहिनूर कु. वीणा गजभिये, कु. वंदना यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button