जिल्हा

खासदार सुनील मेंढे यांना
अभिकर्ता संघटनेचे निवेदन

संजीव भांबोरे
भंडारा ( ऑल इंडिया प्रतिनिधी )लाइफ इन्शुरन्स एजंट असोसिएशन शाखा भंडाऱ्याच्या वतीने सुनील मेंढे,खासदार,भंडारा व गोदिया जिल्हा लोकसभा क्षेत्र, यांना आपल्या मागण्याचे निवेदन देण्यात आले,आणि त्या संबंधीत चर्चा करण्यात आली त्यांनी आपल्या मागण्यांचे पत्र (निवेदन) केंद्र सरकार कडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले, त्यात खालील मागण्यांचा समावेश आहे
एलआयसी च्या पॉलिसी वरील बोनस रेट वाढविण्यात यावे,
भारत सरकारने पॉलिसी वरील लावलेली जीएसटी हटविण्यात यावी , पॉलिसी धारकांनी पॉलिसीवर कर्ज घेतल्यास कर्ज व्याजाचे दर कमी करण्यात यावे, 5 वर्षावरील बंद असलेल्या पालीश्या सुरू करण्याची सुविधा करावी ,
ग्राहकांना पॉलिसीच्या व्यवहार करते वेळी प्रत्येक वेळेस केवायसी मागू नये,
ग्राहकांना मिळणाऱ्या सेवा सुविधा मध्ये सुधारणा करण्यात यावी ,अभिकर्त्यांना मिळणारा टर्म इन्शुरन्स ची मर्यादा वाढविण्यात यावी, अभिकर्त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अभिकर्त्यांना कल्याण कोष बनविण्यात यावे,
अभिकर्त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक कर्ज मिळण्यात यावे ,
अभिकर्ताना गृह कर्जाची मर्यादा वाढविण्यात यावी,
अभिकत्यांची ग्रॅज्युएटी 20 लाख करण्यात यावी ,
अभिकर्त्यांसाठी अंशदायी पेन्शन योजना सुरू करण्यात यावी ,अभिकर्त्यांसाठी अंशदायी भविष्य निधी सुरू करण्यात यावी,
वरील मागण्या पूर्ण करण्यासाठी देशव्यापी असहकार धरने आंदोलन भारतीय जीवन विमा निगम शाखा भंडारा कार्यालया समोर दिनांक 1/9/2022ते 7/9/2022 करण्यात आले .
दिनांक 10 सप्टेंबर 2022 ला

खासदार सुनील मेंढे, त्यांच्या घरी निवेदन देण्यात आले .
यावेळी झोनल विभागाचे मनमोहन भोयर, नागपूर विभागाचे अशोक फुलबांधे, लाईफ इन्शुरन्स एजंट असोसिएशन शाखा भंडाराचे अध्यक्ष राजेंद्र राखडे, सचिव मनोज बोरकर, कोषाध्यक्ष प्रशांत श्रावणकर, सुशील कासेवाले, शिवशंकर निखार, रुपेश आतीलकर, मनोज उजवणे,सोपान आजवले, यांनी निवेदन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button