भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क ★पोलीस कि आवाज★ पुलावरील उखडलेला रस्ता दुरुस्त करा




पं.स.सदस्य सुशिल गणविर यांचा पुढाकार
संजीव भांबोरे
भंडारा साकोली (ऑल इंडिया प्रतिनिधी )तालुक्यातील प्रसिद्ध नागझिरा रोडवरुन साकोली ते जांभळी/खांबा मार्गाने रोज तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची व सामान्य लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.मागील महीन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे दोनदा आलेल्या पुरामूळे या मार्गावरील वडेगाव जवळील असलेल्या नाल्यावरील पुलावरील रस्ता पुर्णपणे ऊखडलेला असुन प्रवाशांना गैरसोयीचे झाले आहे.साकोली तालुक्यातील तुडमापुरी,वडेगाव,खांबा, मालुटोला,भिवसनटोला, पुजारीटोला, गोपालटोली व गोंदिया जिल्ह्यातील कोसमतोंडी,मुरपार,धानोरी, लेंडेझरी या गावातील सामान्य जनता व विद्यार्थी या मार्गाने मोठ्या संख्येने रात्री उशिरापर्यंत येजा करतात म्हणून संभाव्य अपघाताच्या घटना टाळण्यासाठी या पूलावरील उखडलेला रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी या क्षेत्राचे पंचायत समिती साकोली चे अपक्ष सदस्य सुशील रामचंद्र गणविर यांनी केली आहे.




