राज्य

इनसानियत फाऊंडेशनचा “सामाजिक न्यायाचा दीपस्तंभ” उपक्रम एक आदर्श उदाहरण

भंडारा जिल्ह्यातील इनसानियत बहुउद्देशीय फाऊंडेशन आणि मुंबई उच्च न्यायालयातील वकील तसेच विधी विद्यार्थ्यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक अभूतपूर्व मोहिम राबवली.

मुंबई जिल्हा:-दि. ५, ६, आणि ७ डिसेंबर रोजी “तुम्ही एकटे नाहीत, आम्ही आहोत” आणि “आम्ही न्याय घेऊन तुमच्यापर्यंत आलो आहोत” या प्रेरणादायी बोधवाक्यांच्या माध्यमातून ४,००० हून अधिक गरजू नागरिकांना मोफत कायदेविषयक सहाय्य देण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर येथे आयोजित या मोहिमेचा उद्देश त्यांच्या विचारांप्रती श्रद्धांजली अर्पण करत समाजातील दुर्बल घटकांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी बळ देणे हा होता.

या मोहिमेत Writ Petition, तक्रारी, आणि RTI मसुदा तयार करणे, प्रॉपर्टी आणि कौटुंबिक प्रकरणांवरील सल्ला, पोलिस अत्याचाराविरोधातील मार्गदर्शन, मानवाधिकार उल्लंघन प्रकरणांवर सल्ला, खोट्या आरोपांवरील बचावासाठी सल्ला, न्यायालयीन प्रक्रियेतील कागदपत्रांची पूर्तता आणि Legal Aid अंतर्गत मोफत वकील सेवा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे नेतृत्व संस्थेचे संस्थापक आणि सर्वोच्च न्यायालयातील मा. न्यायमूर्ती अभय ओक यांचे फॉर्मर intern श्री. अनिकेत डोंगरे यांनी केले. त्यांच्या सोबत ॲड प्रज्ञा शिंदे, ॲड. विशाल सोनकांबळे, ॲड. मयुरी गटरी, ॲड. साधना चौहान, गणेश ननंदकर, माधव सूर्यवंशी, श्रेयस भुरे, रोहन चौघुले, प्रगती रहांगडाले, भवांजी कांबळे आणि इतर तुमसर मधील सहकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. मा. मुख्य न्यायमूर्ती (मुंबई उच्च न्यायालय) आणि मा. न्यायमूर्ती सूर्यकांत (सर्वोच्च न्यायालय, दिल्ली) यांच्या फॉर्मर Intern ॲड. विशाखा चेले व स्वप्नील साखरे यांचाही सहभाग होता, ज्यामुळे या उपक्रमाचा दर्जा अधिकच उंचावला.

तुमसर आणि भंडारा येथील नागरिकांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले. बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित हा उपक्रम सामाजिक न्यायासाठी एक क्रांतिकारी पाऊल असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

“जर समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळाला नाही, तर कायद्याचे अस्तित्व, शिक्षणाचे महत्त्व आणि सभ्यतेचे उद्दिष्ट अधुरे राहते,” असे ठामपणे सांगण्यात आले. इनसानियत फाऊंडेशनच्या या प्रयत्नांमुळे समाजातील वंचित घटकांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी नवी ऊर्जा मिळाली आहे. सामाजिक न्यायासाठी प्रेरणादायी ठरलेल्या या उपक्रमामुळे बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा अधिक दृढ होत असून, तो समाजासाठी एक दीपस्तंभ ठरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button