भंडारा जिल्हा:-तुमसर तालुक्यातील महालगाव ते नाकाडोंगरी राज्यमार्ग हा रस्ता अतिशय खड्डामय झालेला आहे. ह्या रस्त्यावर पाई चालने सुध्दा अवघड झाले आहे. अवैध रेती चे ट्रक ओव्हरलोड होऊन भरधाव वेगाने धावत असतात. अशा वाहतुकीमुळे नागरिकांचा जिव धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होत आहे.
या रस्ता दुरुस्ती साठी बालाघाट राज्य महामार्गावर तीन तासांचा रस्ता रोको आंदोलन करण्यात आला.या आंदोलना मार्फत अवैध रेती वाहतूक बंद व्हावी. महालगाव-नाकाडोंगरी मार्गाची त्वरित दुरुस्ती व्हावी. ब्राम्हणटोला-बिनाकी रस्त्यावर भारी वाहतूक करण्यास बंदी घालावी
आंदोलन कर्त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन लेखी स्वरूपात दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलन स्थळी कोणतीही अनुचित घटना घळु नये यासाठी सिहोरा पोलीस स्टेशन चे ठानेदार नितीन मदनकर, गोबरवाह पोलीस ठाण्यातील पथक, आंधळगाव पोलीस स्टेशन पथक तसेच भंडारा येथील शिघ्रकृती दलाचे जवान यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी महालगाव , बिनाकी, वारपिंडकेपार, सोंड्या, बपेरा ईथले सरपंच, उपसरपंच , ग्रा. प. सदस्य, तसेच आजुबाजूच्या गावातील शेकडो नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला.