जिल्हा
चौकशी ची तक्रार करताच रस्ता बांधकामावर लिपापोती…
भंडारा जिल्हा:-डोंगरी बुजुर्ग- कुरमुडा-देवणारा ह्या रस्ता बांधकामात गोळ झाल्याची तक्रार व बातमी प्रकाशित करताच खड्डामय झालेल्या रस्ता बांधकामात वरिष्ठांच्या चौकशी च्या भितीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग तुमसर ने रस्ता बांधकामात लिपापोती केल्याची घटना निदर्शनास आली. रस्त्याच्या कडेला मुरुम सुध्दा घातलेला नाही.

सन २०२०-२०२१ अंदाजपत्रक नुसार काम १करोड ८७ लाखाचा असुन त्यामध्ये खुपच भ्रष्टाचार झालेला असून तिन वर्षाकरिता त्याकडेच परिरक्षण असते परंतु विभागांने पुन्हा ४३लाख रुपये मेंटेनन्स वर खर्च कले.
रस्ता बांधकामात लिपापोती साठी लागणारा खर्च कोणत्या फंडातून आणला आहे. परंतु झालेल्या कामाचा अंदाजपत्रक फलक सुध्दा लावलेला नसुन दुरुस्ती झालेल्या कामाचा अंदाजपत्रक फलक लावण्यात आला आहे.




