राज्य
निराधार लाभार्थ्यांची होळी निराशाजनक…
भंडारा जिल्हा:-तुमसर तालुक्यातचं नाही तर संपूर्ण भंडारा जिल्हात होळी हा सन निराधार लाभार्थ्यांचा दु:खात गेला आहे. आतापर्यंत अंदाजे चार महिन्यापासून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याने निराधार लोकांच्या मनात आक्रोश निर्माण झालेला आहे.

शासन परितक्त्या महिला , दिव्यांग व्यक्ती, श्रावण बाळ योजना यांना आधार म्हणून १५०० रुपये मानधन देतो. तो पण वेळेवर मिळत नसल्याने तुमसर तालुका निराधार विभाग तसेच भंडारा जिल्ह्यातील निराधार विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.




