भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूकीसाठी भंडारा पोलीस दल सुसज्ज-जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी..
संपुर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने लोकांपर्यंत पोहचणारा
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
भंडारा जिल्हा वार्ता -भंडारा-गोंदिया जिल्हा लोकसभा क्षेत्राच्या सार्वत्रिक निवडनुका १९ एप्रिल २०२४रोजी होणाऱ्या पहिल्या टप्याच्या होणाऱ्या निवडणुकीत मतदान शांततेने पार पाडण्यासाठी भंडारा जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त लावण्यात येत आहे. जिल्ह्यात येणाऱ्या -जाणाऱ्या मार्ग १) खापा खुर्द (बावनथडी) ,२)बपेरा (सिहोरा) ३) हिवरा (आधंळगाव)४) पाहुणी (सातोना)५) देव्हाळा (गोंदिया रोड) ६) पाथरी (नाकाडोंगरी कंटगी रोड) ७) खरबी (जवाहर नगर) ८) निलज (पवनी) ९) सेंदुरवाफा(साकोली टोलनाका) १०) सोनी चपराळ (लाखांदूर) ११) मौदी (अड्याळ) येथे चौकी नाका लावलेला असुन त्यांवर पोलीस व महसूल विभागाचे कर्मचारी नेमले आहेत.
अनेक अवैध धंद्यांवर पोलीस विभागातर्फे कार्यवाही करण्यात आलेली आहे व एमपीडीए अंतर्गत सुध्दा कार्यवाही करण्यात आली आहे.

परवाना धारकाकडुन शस्त्र जमा करण्यात आले आहेत.
आदर्श आचारसंहिता चा अतिशय प्रभावी पने अमंलबजावणी करण्यात येणार आहे. पोलीस अधिकारी व अंमलदाराचे निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशिक्षण पूर्ण करण्यात आला असून पोलीस बंदोबस्ताचा योग्य नियोजन करण्यात आलेला आहे असे
माननीय पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी प्रेस कान्फेस द्वारा माहिती देण्यात आली.





