मोहफुल हातभट्टी दारुवर पोलीसांची धाड…
संपूर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने लोकांपर्यंत पोहचणारा
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया

तुमसर वार्ता:-तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सोदेपूर गावातील जंगल शिवारात गोबरवाही पोलीस स्टेशन चे ठाणेदार विनोद गिरी आणि त्यांच्या टीमने सोदेपूर जंगल शिवारात दोन चालु मोहफुल हातभट्ट्यावर छापा मारुन पंधरा प्लास्टिक च्या पिशव्या, जर्मन कर्च्या, रबरी ट्यूब, सडवा मोहफुल, असा एकुण अनुक्रमे अंदाजे किंमत एक लाख तेरा हजार पाचसे रुपये व त्र्यात्तर हजार पाचसे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी खेमचंद परतेती तसेच शिवचरण भलावी राहणार सोदेपूर यांच्या वर कार्यवाही करुन अप. क्रं. अनुक्रमे ८२/२०२४कलम ६५(फ), ब, क, ड, ई, म. दा. का. अन्वे गोबरवाही पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर खोब्रागडे,नेपाल गभने,सुरेश किरपाने ह्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सापळा रचुन गुन्हा नोंद करुन कार्यवाही करण्यात आली.




