देश

भेल प्रकल्प सुरु करा-देवचंद कावळे, तालुका प्रतिनिधी (शिंदे गट)

उद्ध्वस्त झाले.हातातील रोजगाराचे साधन राजकरण्यांनी हिसकावून नेल्याने सुशिक्षित युवक बेरोजगार झाले आहेत.विविधांगी समस्या निर्माण झाल्याने भंडारा जिल्ह्यातील भेल प्रकल्प सुरू होणे अत्यंत गरजेचे झाल्याने राज्यातील सत्ताधारी शिंदे गट शिवसेनेचे लाखांदूर तालुका प्रमुख देवाचंद कावळे यांनी सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले.

भंडारा जिल्ह्यातील युवकांना रोजगाराची संधी प्राप्त होऊन जीवनमान उंचावेल,या उदात्त हेतूने पुन्हा आता भंडारा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांना मागणीचे निवेदन पाठवून जिल्ह्यातील महत्वाकांक्षी भेल प्रकल्प सुरू करा अन्यथा सुशिक्षित बेरोजगार युवकांना व्यवसाय करण्यासाठी वीस लाख रुपये बिनव्याजी कर्ज द्यावे अशी मागणी केली आहे.भंडारा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देतेवेळी लाखांदूर शिवसेना तालुका प्रमुख देवचंद कावळे यांच्या नेतृत्वात कामगार सेनेचे तालुका संघटक नितेश दिवटे,विलास नान्हे,लाखनी तालुका शिवसेना उपतालुका प्रमुख सिद्धार्थ हटवार,शुभम येनोळकर,सौरभ वलथरे,महेंद्र वडमक्रम,सौ.सुरेखा विनोद पाखमोडे,रोहित हटवार,सुमित टीचकुले,साजन मेश्राम,जयेश खेडकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ता व बेरोजगार युवक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button