स्थानिक गुन्हे शाखेच्या हुशारीने घरफोडी गुन्हे उघडकिस!


संपुर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त लोकप्रिय न्युज डिजिटल मिडिया
पोलीस कि आवाज न्युज
भंडारा वार्ता:-भंडारा शहरातील स्थानिक गुन्हे शाखा भंडारा चे पोलीस कर्मचारी रात्री पेट्रोलिंग करत असतांना संशयास्पद फिरत असलेला एक व्यक्ती आढळून आल्याने त्याचा नाव आणि गाव विरचारले असता त्याने त्याचे नाव गुरुदेव उर्फ मिरची खुशाल जांभुळे जयदुर्गा नगर भाडेवाढी पारडी नागपुर हल्ली मुक्काम घनश्याम लिमचे यांच्या राहत्या घरी गांधी चौक भंडारा असे सांगितले. संशयीपद आरोपीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने कोतुर्ना टोली, भंडारा शहर,अड्याळ व लांखादुर जवळ दोन घरफोडी केल्याचे कबुल केले.ह्या पोलीस स्टेशनमध्ये तपासणी केली असता घरफोडी चे पाच गुन्हे दाखल आहेत.

सदर गुन्ह्यातील चोरी केल्यास मुद्देमाल १३ग्राम सोना, घरगुती सामान,नगदी १०००असा एकुण ४५,६००रुपयाचा मुद्देमाल त्यांच्या राहत्या घरातून जप्त करण्यात आला.
गुन्ह्याची कार्यवाही
पोलीस अधीक्षक लोहित मतानी साहेब व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली
स्थनिय गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोडकर,अजय बारापात्रे , संदिप मते,सतीश देशमुख,सैलेश बेदुरकर,मळावी,तिवाळे,पेठे आणि लक्ष्मी कापगते यांनी अथक परिश्रम घेऊन भंडारा जिल्ह्यातील एकूण पाच गुन्ह्याची उघड केली.



