तुमसर शहरातील वाढत्या गुन्हेगारीला कोन अधिकारी आळा घालेल ?

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क/चॅनल
भंडारा जिल्हा वार्ता:-तुमसर शहरात जुन्या वादावरून न ईम शेख वय ५०वर्ष राह.रामकृष्ण वार्ड तुमसर याचा बंदुकीने फायर तसेच चाकुने गळ्यावर वार करुन त्याला जिवाने मारण्याची गोबरवाही रेल्वे क्रॉसिंग जवळ घडली,मारेकरी आरोपी व म्रुतक हे दोन्ही तुमसर शहरातील!
तुमसर शहरात दिवसेंनदिवस क्राईम चा ग्राफ वाढत आहे.

सहा वर्षांपूर्वी नगरसेवक प्रशांत ऊके याच्यावर सुध्दा गोळीबार करून हत्या करण्यात आली होती.तेव्हापासुन तुमसरातील गुन्हेगारीला कट्याचे वापर करण्याचे सुरु झाले.
तुमसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस कोणती उपाययोजना करते ह्याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित आहे.
न ईम शेख च्या हत्या प्रकरणात गोबरवाही पोलीसांनी नव आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी क्रं.१) संतोष दहाट आंबेडकर वार्ड तुमसर २) सतीश दहाट, आंबेडकर वार्ड तुमसर ३)सागर पंधरे ,राह. तुमसर४) अमन मेश्राम राह.तुमसर ५) आकाश पोहलटकर,तुमसर ६) गुणवंत येवकार राह.नागपुर ७)आशीस नेवारे राह.नागपुर ८)रवि बोरकर राह.नागपुर ९)विशाल मानेवर राह.नागपुर यांच्यावर गुन्हा दाखल करुन अप.क्र.२९१/२०२३कलम ३०२,१४३,१४७,१४८,१४९,भा.द.वि.३/२५ ,४/२५,२७भार.हत्यारा कायदा अन्वे सहा आरोपीला अटक करण्यात आली.
ह्या प्रकरणी पोलीस सर्व बाजुने तपास करीत आहेत त्याब्यात घेतलेले आरोपी चे मोबाईल तपासले जात असुन ते कोणाच्या संपर्कात होते याचा शोध घेतला जात आहे.
ह्या सर्व घटनेचा तपास मान.लोहित मतानी पोलीस अधीक्षक,मान.ईश्वर कातकडे ,अपर पोलीस अधीक्षक, रश्मिता राव, सहाय्यक पोलीस अधीक्षक तुमसर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार नितीन मदनकर करीत आहेत
.



