क्राइम
भंडारा जिल्ह्यातील प्रकरण:-तुमसर शहरातील सिंधुताई महिला नागरी सहकारी पतसंस्थेत १० लाखाच्या वर रक्कमेची चोरी!

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क/चॅनल
तुमसर वार्ता-प्राप्त माहितीनुसार तुमसर शहरात चोरट्यांचे प्रमान वाढले असून सिंधुताई महिला नागरी सहकारी पतसंस्था येथे १० लाखांच्या वर रुपयांची चोरी झाल्याचे दिसून आले.
चोरट्यांनी शटर चा ताला तोडुन १० लाखांच्या वर कपाटातुन लंपास केल्याचे निदर्शनास आले.पतसंस्थेमधिल व सोनी ज्वेलर्स च्या घरातील CCTV फुटेज ची पाहनी केली असता अज्ञात आरोपी २५ ते ३४ वयोगटातील दोन तरुण असल्याचे दिसून आले.

पतसंस्थेतील एवढी मोठी रक्कम चोरी गेल्याने तुमसर शहर व परिसरात हडकंप मचलेला आहे.
चोरांच्या प्रमाणात वाढ झाल्याने सामान्य नागरिकांना व व्यवसायीकांना आपल्या सामानाची असुरक्षितता जानवत आहेत.
अशा चोरट्यांच्या टोळीवर कोन आळा घालेल असा प्रश्न तुमसर शहर व परिसरातील जनतेच्या मनात उद्भवत आहे.




