Uncategorized

दख्खनचा राजा लकी ड्रॉ च्या आयोजकांवर महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा व आमिषे दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई करा – बहुजन मराठी पत्रकार संघ (महा राज्य)

पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क


वार्ता संपादक राजेश ऊके

सोलापूर – पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार दि 23 रोजी स्मृती भवन यशवंतनगर अकलूज येथे दख्खनचा राजा लकी ड्रॉ चे सोडत कार्यक्रमात दोन महिलांना मारहाण करण्यात आली होती त्या अनुषंगाने सातबारा न्यूज एक्सप्रेस या वेब पोर्टल वर बातमी प्रसिद्ध झाली होती या बातमीच्या आधारे महाराष्ट्र राज्यातून अनेक नागरिकांचे फोन न्यूज चॅनलचे संपादक व बहुजन मराठी पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आप्पा लोखंडे यांना आले कि आमची सुध्दा फसवणूक झाली आहे ती फसवणूक उत्तम भगत व दिलीप डांगे यांनी दख्खनचा राजा या लकी ड्रॉ च्या ममाध्यमातून केली आहे तसेच या कार्यक्रमात काही ग्राहकांच्या मोबाईल फोन वर एक व्हिडिओ व्हायरल झाला यामध्ये उत्तम भगत हे कशा प्रकारे सर्व सामान्य जनतेला फसवले जाते हे त्यांनी स्वतः सांगितले आहे त्यामुळे ज्या ग्राहकांना मोठे अर्थात वाहनांची बक्षिसे लागली आहेत त्या ग्राहकांचा मोबाईल नंबर व नाव पत्ता देण्याची विनंती केली होती परंतु त्यांनी या महिलांना मारहाण करण्यात आली अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुळ कारणांकडे लक्ष न देता फक्त मारहाण झाली आहे म्हणून भगत आणि डांगे यांच्या अंगरक्षाकांवर तक्रार दाखल केली आहे परंतु व्हायरल व्हिडिओची सत्यता जाणून घेतली पाहिजे कारण हा व्हिडिओ जबरदस्तीने बनवून घेतला किंवा अपहरण करून बनवला असेल तर भगत यांनी पोलीसांत तक्रार दाखल का केली नाही जर तक्रार दाखल केली असेल तर ते कोणत्या पोलीस ठाण्यात दाखल केली याचा खुलासा मा पोलीस निरीक्षक का करत नाहीत ? असा सवाल आप्पा लोखंडे यांनी उपस्थित केला
भगत व डांगे यांनी विविध जिल्ह्यांतील ग्राहकांचे रोख पैसे घेतले आहेत परंतु अद्याप त्यांना कोणताही मोबदला मिळाला तर नाहीच परंतु त्या लकी ड्रॉ मध्ये नाव ही नाही आणि नंबर सुध्दा नाही जे ग्राहक पोलिसांत तक्रार करेल त्याला वस्तू पाठवितो असे सांगितले जाते अशा अनेक ग्राहकांच्या तक्रारी आलेल्या होत्या त्यामुळे दि 25 रोजी अकलूज पोलीस ठाणे व पोलीस उप अधीक्षक कार्यालय अकलूज येथे बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने महिला अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार व मोठं मोठ्या आमिषे दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दख्खनचा राजा लकी ड्रॉ चे आयोजक उत्तम सुखदेव भगत व दिलीप मनोहर डांगे यांची सखोल चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button