भंडारा जिल्ह्यातील वरठी पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेची लोखंडी सलाखीने वार करुन हत्या
संपुर्ण विदर्भात झपाट्याने वाढत असलेला
“पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क”
मिळालेल्या माहितीनुसार मोहाळी तालुक्यातील वरठी जवळपास असलेल्या एकलारी गावातील वेणु कंठीराम बालपांडे राह.आंबेडकर वार्ड एकलारी असुन म्रुतक वेणु बालपांडे हिला दोन मुलं व एक मुलगी होती मुलीचा लग्न होऊन ति आपल्या सासरी होती तर एक मुलगा पुण्यात नोकरी करित होता सध्या म्रुतक,तिचा पती व मुलगा कुनाल असे तिन लोकं घरी राहत होते, नवीन घराचे बांधकाम सुरु असल्याने ते सध्या दुसरीकडे किरायाने राहत होते.
घटनेच्या दिवशी मुलगा कुनाल हा बहिणीकडे रात्री झोपायला गेला होता त्यावेळी पती पत्नी दोघेचं घरी होते

दुसऱ्या दिवशी सकाळी दार उघडले न दिसल्याने शेजारील मुलाने कुणाल ला बोलावून आणले.कुणाल लगेच भाडे घरी येताच दाराला कुलूप लावले होते आणि आतमध्ये कुलर सुरु असले त्याने मोबाईल वर फोन लावला तर मोबाईल आतमध्ये वाजत होता,व कोणी प्रतिसाद देत नसल्याने घाबरून शेजारील मित्राच्या सहाय्याने दार तोडून आत प्रवेश करताच तो खूप घाबरला,त्याने रक्त बंबाड म्रुत अवस्थेत आई दिसुन आली, आईच्या डोक्यावर लोखंडी सलाखीने वार करुन तिचा जीव घेतला होता.
सदर घटनेची माहिती गावभर वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर पोलीस पाटील संतोष बालपांडे यांनी वरठी पोलीस स्टेशन ला सदर प्रकरणाची माहिती.
वरठी पोलीसांनी घटनास्थळी पाहणी केली व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन साठी भंडारा ला पाठवले.

ह्या सर्व महत्त्वाच्या कामासाठी वेणुचे पती कंठीराम दिसुन न आल्याने परिसरात शोध घेतला तरी दिसुन नाही आले.

त्यानंतर वरठी पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष ठाणेदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशन चे कर्मचाऱ्यांनी सी सी टी व्ही कॅमेरा चा आधार घेऊन त्यामध्ये कंठीराम दोन थैलै हातात घेऊन त्याने वरठी रेल्वे स्टेशन मध्ये जाऊन रेल्वे गाडी ची माहिती काढली मात्र गाडी नसल्याने पुन्हा वरठी गावाच्या मुख्य रस्ताने तो सनफ्याग बस स्ट्यान्ड मध्ये जाऊन भंडारा च्या दिसेने जाणारी बस घेतो अशी माहिती सी सी टी व्ही च्या आधारे मिळाली असुन पुढचा तपास लोहित मतानी ,पोलीस अधीक्षक भंडारा सहाय्यक पोलीस निरीक्षक “अभिजीत पाटील” करित आहेत.




