अमली पदार्थ (गांजा) तस्करी करणारे आरोपी भंडारा पोलीसांच्या ताब्यात!
> संपुर्ण विदर्भात झपाट्याने वाढत असलेला
पोलीस कि आवाज न्यूज़ नेटवर्क
मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक मंगेश कराडे हे रात्रीच्या वेळेस पेट्रोलिंग करित असतांना गुप्त माहिती द्वारे श्मशान भुमी परिसरात पल्सर मोटरसायकल ने गांज्याची वाहतूक करणाऱ्यांची खबर मिळताच पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांनी वरीष्ठ अधिकारी लोहित मतानी,पोलीस अधीक्षक भंडारा यांना माहिती देऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनात श्मशान भुमी भंडारा परिसरात सापळा रचला असता मिळालेल्या खबरीनुसार पल्सर मोटरसायकल ने प्लास्टिक बोरी मध्ये प्रतिबंधित गांज्याची वाहतूक करताना दोन ईसम 1)मनोज रोशन ठवरे राह.आंतरगाव लाखांदूर 2)प्रनय धनराज मेश्राम राह.ईन्दोरा लाखांदूर, जिल्हा भंडारा हे मिळुन आल्याने त्यांच्या ताब्यातील एक बोरी मध्ये 6.010 किलो ग्रॅम गांजा अंदाजे किंमत 60,000 एक काळ्या रंगाची पल्सर मोटरसायकल क्रं. MH-36 av 1317अंदाजे किंमत 50,000 रुपये असा एकूण किंमत 1,10,000 असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे.
सदर गुन्हा अप.356/2023कलम 8(c,)20(b)(ii)(b)29 एनडीपीएस कायदा 1985 दिनांक 23/06/2023रोजी दाखल करण्यात आला.

पुढील तपास लोहित मतानी, पोलीस अधीक्षक भंडारा ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुभाष बारसे व पोलीस उपनिरीक्षक मंगेश कराडे आणि त्यांचे कर्मचारी करित आहेत.




