क्राइम

भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सापळा रचुन कार्यवाही

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

भंडारा जिल्ह्यातील मोहाळी पं.समिती अंतर्गत तक्रारदार पिंपळगाव येथील रहिवासी असुन रोजगार हमी योजना अंतर्गत गुरांचा गोठ्याचे बांधकामाचे८९,५००रु. चे बिल मंजुर करण्यासाठी हर्षपाल संदेश राऊत तांत्रिक साहाय्य(कंत्राटी)आणि राधेश्याम हिरामण गाढवे तांत्रिक सहाय्यक(कंत्राटी)यांनी९,०००रु लाचेची मागणी केली.

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवले त्यांनी सापळा कार्यवाही करुन दोघांही तांत्रिक कंत्राटदाराला पकडले व मोहाळी पो.स्टेशन येथे सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

मा. राहुल माखनीकर(लाप्रवि. नागपूर),मा.मधुकर गिते(अपर पो. अधिक्षक लाप्रवि नागपुर),डॉ. अरुनकुमार लोहार(पोलीस उप अधिक्षक लाप्रवि. भंडारा) यांच्या मार्गदर्शनाखाली मा.कमलेश सोनटक्के(पोलीस निरीक्षक लाप्रवि. भंडारा),मा.अमित डहारे(पोलीस निरीक्षक लाप्रवि. भंडारा),सहा. फौज. संजय कुजंरकर, पो. हवा. मिथुन चांदेवार, पो.ना. अतुल मेश्राम, गाढवे, रनदिवे, पोटे, वरठी, कडव, लेंडे, मापोसि अभिलाषा गजभिये, चालक थोटे व सर्व लाप्रवि. भंडारा यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button