बावनथडी प्रकल्पाचे पाणी चांदपुर जलाशयात सोडा – माजी खासदार शिशुपाल पटले

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
भंडारा- ४५ गावातील शेतकऱ्यांना चांदपूर जलाशयाचे पाणी सिंचनासाठी दिले जाते.परंतु जलाशयात पाण्याचा आवक कमी असल्याने बारमाही ओलित होत नाही.बारमाही ओलित होण्यासाठी सोंड्याटोला उपसा सिंचन योजना सुरू करण्यात आली.लिफ्ट द्वारे सोंड्याटोला वरून पाणी चांदपूर जलाशयात सोडण्यात येते.तरीही शेतकऱ्यांना दरवर्षी बारमाही ओलितासाठी पाणी मिळत नाही.एकवर्षी डाव्या कालव्याला तर दुसऱ्या वर्षी उजव्या कालव्याला मिळतो एवढेच नव्हे तर उजव्या कालव्याला दोन वर्षी आळीपाळीने पाणी द्यावा लागतो. म्हणजेच चांदपूर जलाशयात सध्या असलेल्या पाण्याच्या साठ्यानुसार बारमाही ओलित होत नाही. बारमाही ओलित होण्यासाठी बावनथडी सिंचन प्रकल्पाचे पाणी लोभी तलावात आणणे व तिथून लिफ्ट द्वारे गणेशपूर तलावात सोडल्यास कमी खर्चात चांदपूर जलाशयात पाणी पोचवता येते.तसेच बावनथडी प्रकल्पातून वगळलेल्या १२ गावांना सुद्धा सिंचनाचे पाणी मिळू शकते.आणि चांदपूर जलाशयाचे आपासीत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीलाही बारमाही ओलित होण्यास मदत होणार आहे अश्या प्रकारची मागणी माजी खासदार शिशुपाल पटले यांनी माजी राज्यमंत्री डॉ. परिनयजी फुके व राज्याचे उपमुख्यमंत्री व सिंचनमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस यांचे कडे आज करण्यात आली. मा. देवेंद्रजी फडणवीस व मा. परिनयजी फुके यांचे आदेशानुसार त्यासंबंधी उद्या नागपूर येथे चिफ इंजिनिअर यांचे कार्यालयात सकाळी १०.३० वा.बैठक होणार आहे.
