अर्धवट जळलेल्या म्रुतकाची ओळख पटुन त्याचा खुनाचा खुलासा
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
पोलीस अधीक्षक भंडारा मा. लोहित मतानी यांनी दिलेल्या प्रेस काँन्फ्रेन्स ला दिलेल्या माहिती नुसार
पोलीस स्टेशन लाखनी अंतर्गत मौजा गळेगाव येथील वन विभाग लाकुड आगारात पश्चिमेला १३/०४/२०२३ ला अर्धवट जळलेली अज्ञात व्यक्तिची प्रेत दिसून आल्याने कार्तिक शेंडे रा. राजेगाव ता. लाखनी यांच्या दिलेल्या माहितीनुसार पो.स्टेशन लाखनी येथे अप. क्र.११४/२०२३कलम३०२,२०१भा.द.वि.अन्वे अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

सविस्तर व्रुत्त असे की मा.पोलीस अधीक्षक लोहित मतानी ,व अपर पोलीस अधीक्षक मा.ईश्वर कातकडे यांनी गुन्हाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.सुशांत सिंग, उपविभाग साकोली यांच्यांयांच्याकडे दिला. यांच्या मार्गदर्शनास श्री.नितीन चिंचोळकर, पो. नि.,स्थागुशा, मा. राहुल देशपांडे पो.नि. सायबर पोलीस स्टेशन यांचे वेगवेगळे पथक तयार करून विदर्भातिल संपूर्ण जिल्ह्यातील गुम पुरुषांची माहिती मिळविली तसेच तान्त्रीक द्रुष्ष्या icjsप्रनालितुन गुमपुरुषाची यादी मिळवून तपास सुरू केला. त्यामध्ये नागपूर येथील शांतीनगर पोलीस स्टेशन सदर गुम ईसम मोहम्मद तन्वीर अब्दुल रजाक याची नोंद आढळुन आली. सदर ईशमाच्या नातेवाईक व मित्र परिवाराला विचारपुस करुन तपास केला त्या दरम्यान१)आतिक लतीफ शेख२)फैजन परवेश खान यांना यांना ताब्यात घेउन त्यांची विचारपुस केली असता सदर गुन्हा जुन्या भांडणावरुन झाल्याने खुन केल्याचे कबुल केले.

आरोपी आतिक लतिफ शेख ईन्डीका कार क्र.mh40डीजी2282ने फिरण्याकरिता गेले असता गड्डिगोदाम नागपूर येथे म्रुतक मोहम्मद तन्वीर याची माफी मागुन त्याला फिरण्याकरीता त्यानंतर ते कारने मिठानिम दरगा नागपूर येथे गेले व आरोपी आतिक शेख याने भाचा फैजन खान फोन करुन बोलविले, तिघेही ईन्डिका ने फिरण्याकरिता भंडारऱ्यावरुन लाखनीकडे जात असताना कच्च्या रस्त्याने जंगल परिशरात तलावाजवळ गाडी थांबवुन आरोपी व म्रुतक गोष्टी करत असतांना म्रुतक याने शिविगाळ करने सुरू केले ह्या वादावरून आरोपींने दुप्पट्याने गळा आवळुन व चाकुने वार करुन जिवाने ठार मारुन व त्याच्या अंगावर गाडितील डिझल टाकून आग लाऊन जाळुन लाश जंगलात फेकून दिली व गाडीने नागपूर येथे निघुन गेले.

मा.मिलिंद तायडे, (पोलीस निरीक्षक )लाखनी,
सपोनि सुबोध वंजारी, सपोनि नितेश देशमुख, सपोनि ऋषीकेश चाबूक स्वार, पोउपनि. धनराज सेलोकर, पोउपनि. माधव परशुरामकर, पोहवा. राजेन्द्र कुरुडकर, पोहवा. प्रशांत गुरव, पोअं. राऊत, कापगते, रामटेके, माळोदे, पुराम यांनी सहकार्य केले.
