क्राइम
ईलेक्ट्रीक मोटर पंप चोर गोबरवाही पोलीस स्टेशन च्या ताब्यात

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम देवनारा गावाजवळील शेतशिवाराला लागुन असलेल्या बावनथडी नदी काठावर फिल्टर तयार करुन त्या ठिकाणी ठेवलेली किर्लोस्कर कंपनीची ३ एच. पी.ची मोटरपंप किंंमत १५,०००चोरट्यांनी चोरुन नेले.
सुचना:- बातम्या दररोज वाटसाप स्टेटस, फेसबुक, ईन्स्टा,ट्युटर, गुगल वर(policekiaawaj.com)सर्च करुन बघु शकता.
फिर्यादी शारदाप्रसाद भट यांच्या तक्रारी वर गोबरवाही पोलीस स्टेशनमधिल कर्मचाऱ्यांनी चोरट्याचा शोध करुन आरोपी शिशुपाल पुष्फतोडे रा. कुरमुळा याला ताब्यात घेतले व त्याकडुन मोटर पंपाची किंमत १५,०००रु हस्तगत करण्यात आले,व त्याच्यावर कलम भादवि ७७९गुन्हा नोंद करण्यात आला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.नितीन मदनकर यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी करिता गजानन चव्हाण ,तपास अधिकारी प्रविण खोत यांनी आरोपी चा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.




