देश

केन्द्रीय ग्रुहमंत्री अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर येणार!

कोल्हापूर, (पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क) 8 (जिमाका) :-

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्या अनुषंगाने सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून दौरा यशस्वी करावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, इचलकरंजी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उप जिल्हाधिकारी भगवान कांबळे यांच्यासह सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

उच्च तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहा यांचा 19 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर जिल्हा दौरा असून यामध्ये ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, राजर्षी शाहू महाराज पुतळा या ठिकाणी जाऊन अभिवादन करणार आहेत. त्याप्रमाणेच अन्य कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. अनुषंगाने जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेने योग्य ती खबरदारी घ्यावी. तसेच 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्याने व याच दिवशी कनेरी मठाच्या वतीने शहरात शोभायात्रा नियोजित आहे. तरी प्रशासनाने वाहतुकीचे योग्य ते नियोजन करावे व कोणत्याही कार्यक्रमाला वाहतुकीचा अडथळा होणार नाही या दृष्टीने प्रयत्न करावेत अशा सूचना त्यांनी केल्या.

महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा छत्रपती शाहू महाराज पुतळा सुशोभीकरण करून घ्यावे. कोल्हापूर शहरात सर्वत्र स्वच्छता ठेवावी अशा सूचना श्री पाटील यांनी केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button