जिल्हा

रस्ता दुभाजकावरील कुंड्या व झाडे झाली गायब

:- दुभाजकाची दुर्रव्यवस्था

:- मा.मुख्याधिकारी तुमसर यांची यांनी घेतली गांधारी ची भुमिका

तुमसर::- पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

शहरातील तुमसर खापा मार्गावरील रस्ता दुभाजकांकडे नगर परिषद प्रशासकीय यंत्रणेचे अत्यंत दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करताना कधीकाळी आल्हाददायक वातावरणाचा अनुभव देणारे हे दुभाजक आता नागरिकांच्याच जीवावर उठू लागलेत. काही ठिकाणी या दुभाजकांवर काटेरी झुडपे उगवली, तर काही ठिकाणी कचराकुंडीसारखा त्याचा वापर होत असल्याचे दिसून येत असताना मात्र मुख्याधिकारी यांनी गांधारीची भूमिका घेतली आहे.
कधी काळी तुमसर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे कार्य तत्कालीन नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी ग्रीन तुमसर क्लीन तुमसर या संकल्पनेतून जुना बस स्थानक ते बाजार समिती पर्यंत रस्ता दुभाजक तयार करून त्यावर आकर्षक कुंड्या, झाडे व पथदिवे लावून रस्ता सुशोभित केला होता. भंडारा येथून तुमसर मध्ये प्रवेश करताच आल्हाददायक वातावरणाचा अनुभव देणारे हे दुभाजक होते. दरम्यान नगर परिषदेत सत्ता परिवर्तन झाले. आणि जैसे थे अशीच काहीशी स्थिती झाली असताना वर्तमान पत्रात बातमी प्रकाशित झाल्या नंतर परत त्या दुभाजकावर लाखो रुपयांची झाडे लावण्यात आली मात्र नियोजना अभावी हळू हळू ते झाडे ही नष्ट झाल्याचे चित्र आहे. दुभाजकात लावलेली फुलांची झाडे गायब झाली, बऱ्याच दुभाजकांमधील गवतही वाळले. काही दुभाजकांच्या काठांवर वाहनांचा आघात झाल्याने ते फुटून त्यातील दगड बाहेर पडलेत. परंतु विखुरलेले हे दगड अद्याप शाबूत केले गेले नाही. किंवा इतर ठिकाणी लोंबकळलेल्या झाडांच्या फांद्याही छाटल्या गेल्या नाहीत. दुभाजकावर अनेक कुंड्या तुटून पडल्या आहेत अनेक झाडे पाण्या अभावी जागेवरच वाळले आहेत . अशी विदारक स्थिती तुमसर शहराची झाली असताना येथील मुख्याधिकारी मेश्राम यांचे या कडे दुर्लक्ष होत आहे. एकीकडे शासन झाडे लावा झाडे जगवा या साठी लाखो करोडो रुपये खर्च करत आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष मुळे अशा योजनांना हळताल फासले जात आहे.
कोट:-
एके काळचा आल्हाददायक वाटणारा रस्ता दुभाजक आता न प च्या दुर्लक्षित धोरणामुळे ओस पडला आहे. दुभाजकावर काही प्रमाणात जीवित असलेल्या झाडांना वाचविणे गरजेचे आहे. न. प. ने पाणी व देखरेख अभावी हळू हळू मारण्यापेक्षा त्या झाडांना एकदाच जिवंत जाळून टाकावे म्हणजे त्यांना समाधान होईल.


अभिषेक कारेमोरे
माजी नगराध्यक्ष तुमसर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button