जिल्हा

अर्चना उके यांचा नागपुर विभाग प्रमुखांतर्फे सत्कार

साकोली : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या नागपूर विभागातील साकोली शाखेत गणतंत्र दिवस स्पर्धा ९ ते २५ जानेवारी पर्यंत सुरू असून या स्पर्धेदरम्यान अभिकर्त्यांचा उत्साह वाढविण्याकरिता विशेष करून नागपूर विभाग प्रमुख प्रणयकुमार यांनी साकोली शाखा कार्यालयात दिनांक ( २१ जाने.) ला साकोली शाखेतील सर्व अभिकर्त्यांच्या बैठकीत विमा सल्लागार अर्चना उके यांचा सत्कार करण्यात आला.
या सभेत साकोली शाखेतील सर्व अभिकर्ता सभेला उपस्थित होते. प्रसंगी शाखेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अभिकर्त्यांचा सत्कार नागपुर विभाग प्रमुख यांच्या हस्ते करण्यात आला. येथे साकोली शाखेत गणतंत्र दिवस स्पर्धेत सर्वात जास्त पॉलिसी पुजा करंजेकर समूहातील नवीन महिला कुशल अभिकर्ता अर्चना उके यांनी केले आहे. गणतंत्र दिवस स्पर्धेदरम्यान त्यांनी चालू आर्थिक वर्षात अवघ्या १० महिन्यात १०० पॉलिसी पुर्ण केल्या. साकोली शाखेत नवीन अभिकर्त्यांमध्ये पहिल्याच वर्षी उल्लेखनीय कार्य करीत १०० पॉलिसी करण्याचे कार्य साकोली शाखेतील नवीन अभिकर्ता अर्चना उके यांनी केले. सभेत साकोली शाखेतील सर्व अभिकर्त्यांच्या उपस्थितीत नागपूर विभागातील सी एल आय मॅनेजर लटारे आणि साकोली शाखेतील अधिकारी वर्गाच्या उपस्थित सत्कार समारोह पार पडला या प्रसंगी नागपूर विभाग प्रमुख प्रणयकुमार यांनी साकोली शाखेत उलेखनिय कार्य केल्याबदल अर्चना उके यांचा सत्कार केला या प्रसंगी ग्रुप लीडर पुजा कुरंजेकर उपस्थित होते. अर्चना उके यांनी आपल्या यशाचे श्रेय ग्रुप लीडर पुजा कुरंजेकर यांना दिले व सोबत पॉलिसी देणाऱ्या सर्व पॉलिसी धारकांना आपल्या यशाचे श्रेय दिले आहे. आयोजन एल आय सी साकोली शाखेचे शाखाधिकारी कळमकर व सहा.शाखाधिकारी उमेश लिंगलवार यांनी केले होते. सरतेशेवटी राष्ट्रगीताने सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button