जिल्हा

गावा गावात खेड्यापाड्यातील मुली एस. टी. अहिल्यादेवी होळकर पासामुळे शिकल्या – गणेश भाऊ करे पाटील.

पोलीस की आवाज न्यूज वार्ता प्रमिला जाधव पश्चिम महाराष्ट्र सह संपादक

करमाळा, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळामध्ये सुरक्षितता अभियान आणि इंधन बचत मासिक मोहीम सुरू आहे, या दोन्ही मोहिमेच्या अनुषंगाने करमाळा आगार येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी कार्यक्रमात बोलताना एस टी कर्मचारी हा ऊन पावसाची तमा न बाळगता सेवा करत असतो, आजही शाळांच्या ज्या सहली जात असतात, व शालेय विद्यार्थ्यांची जी ने – आण, होते ती प्रामुख्याने महामंडळ करत असते, पालकांना आजही महामंडळावरचा विश्वास टिकून आहे,. ‘मुलगी शिकली, प्रगती झाली ‘ म्हणतात. परंतु एक गोष्ट इंथ आवर्जून नमूद करावी वाटते ती म्हणजे गाव- खेड्यातील मुली ह्या एस. टी. मुळे शिकल्या, एस. टी. च्या अहिल्यादेवी होळकर पासामुळे शिकल्या,.


स्वराज्याची उभारणी करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे जसा सह्याद्री उभा होता, सध्या तसा संपूर्ण महाराष्ट्राला जोडणारा दुवा महामंडळाच्या रुपात सह्याद्री सारखा उभा आहे, असे गणेश भाऊ करे पाटील म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button