Uncategorizedक्राइम

भंडारा जिल्ह्यातील वरठी पोलीस स्टेशनचे पाच कर्मचारी त्यांच्या निष्काळजीपणा- मुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत निलंबनाची कार्यवाही

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क क्राईम वार्ता★प्राप्त माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील वरठी पोलीस स्टेशन अंतर्गत दि.१३आँक्टोंबर च्या रात्री २ वाजे. दरम्यान रुपेश गाढवे व आषीश मोहतुरे यांनी कोजागिरी कार्यक्रम आटोपून घराच्या दिशेने येत असतांना एक अज्ञात व्यक्ती घराच्या भिंतीवरुन उडी घेतांना त्यांना दिसून आला संशयावरून त्यांनी त्याच्या पाठलाग करुन पकडले असता त्याजवळ चोरीचे साहित्य आढळून आले त्यांनी फोनद्वारे सदर माहिती पोलीस स्टेशनमध्ये दिली.त्यानंतर घटनास्थळी पोलीस पथक पोहोचले त्यानंतर चोरट्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले.परंतु वरठी पोलीस स्टेशनमधुन चोरट्याला सोडण्यात आले.

दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजे. आशीस मोहतुरे व रुपेश गाढवे पोलीस स्टेशन वरठी ला गेले असता काहीतरी वेगळ्या प्रकरणासाठी गेले असता व चोरट्याच्या प्रकरणाची विचारपूस केली उलट उत्तर देऊन दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर सदर प्रकरणची माहिती स्थानिक प्रतिनिधी ला देण्यात आली, प्रतिनिधी मार्फत पोलिसांना ह्याबाबत विचारले असता उडवाउडवीचे उत्तर देऊन दुर्लक्ष केले. सदर घटनेची वरठी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात निंदा होत आहे. अशाच प्रकारचे पोलीस स्टेशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात गुन्हे होत असल्याचे व अवैध व्यवसाईकांना पोलीसांचे पाठबळ मिळत असुन परिसरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असे नागरिकांनी मत व्यक्त केले.

★पोलीस कि आवाज★न्युज नेटवर्क शासनाला प्रश्न विचारते की ह्यामध्ये सर्वात मोठा दोशी कोण?

पाच निलंबित कर्मचाऱ्यांची नावे असे पोलीस हवालदार राजेश भांबरे, सहाय्यक गंगाधर कांबळे, पो. हवा. बळीराम शेंडे, पो. सिपाई रेहान पठान, नायक पो सिपाई प्रेमनाथ डोरले आदींना निलंबित करण्यात आले.

मा.पोलीस अधीक्षक लोहित मतानी साहेब संपूर्ण घटनेवर बारकाईने लक्ष देत आहेत.

ह्या निलंबनाच्या घटनेमुळे भंडारा जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्टेशनमध्ये खळबळ माजली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button