भंडारा जिल्ह्यातील सिहोरा पोलीस स्टेशन अंतर्गत सायबर क्राईम भंडारा द्वारा चोरांना अटक करुन चोरी गेलेला माल जप्त


भंडारा:-

राजेश ऊके (मुख्य संपादक, पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क)
★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क क्राईम वार्ता★प्राप्त माहितीनुसार सिहोरा पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा सिहोरा येथील फिर्यादी सुनील धनराज सरनागत रा.मुरली ता.तुमसर यांचे किराना दुकान पात्रे काँम्लेक्स मध्ये होती व जायस्वाल काँम्लेक्स मध्ये गोडाउन होता.

नेहमीप्रमाने दुकान व गोडाउन उघडून पाहिले असता कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळेस कुलूप तोडुन अंदाजे ४८,५००रु चे चोरून गेल्याचे फिर्यादी च्या तक्रारी वरुन सदरचा गुन्हा पो.स्टेशन सिहोरा येथे नोंद करुन तपास करण्यात आला.

सिहोरा पोलीस स्टेशन ने सायबर क्राईम च्या मदतीने दोन आरोपींना विचारपुस करुन ताब्यात घेण्यात आले व त्यांच्याकडुन संपूर्ण माल जप्ति करण्यात आला असून सदर गुण्यात अजुन एका आरोपीचा शोध घेणे सुरू असुन सदर कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक लोहित मतानी साहेब, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सिहोरा येथील कर्तव्यदक्ष ठानेदार नारायण तुरकुंडे व हवालदार मनोज ईडपाते, किशोर खोब्रागडे,गिरीश पडोळे, सरनागत, पो.सि.,ब्राह्मण, चौधरी, गजाम यांनी सहकार्य केले.





