जिल्हा

भंडारा जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची कार्यकारिणी गठीत

अध्यक्षपदी रूपेश बोरकर तर सचिवपदी शरद कायते

संजीव भांबोरे
भंडारा (ऑल इंडिया प्रतिनिधी )ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची कार्यकारिणी गठीत झाली असून दिनांक 27/9/2022 रोज मंगळवार ला जिल्हा परिषद भंडारा येथे श्री. विलास भाऊ कुमरवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आढावा सभा घेण्यात आली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांना निवेदन देण्यात आले आढावा सभा संपल्यानंतर, जिल्हाध्यक्ष हेमराजजी वाघाडे आणि जिल्हा सचिव माणिकजी लांबट यांनी राजीनामा दिल्यामुळे भंडारा जिल्हा कार्यकारणी ची विषेश सभा राज्याध्यक्ष विलासभाऊ कुमरवार यांना तशी सूचना दिली , सर्वानुमते निर्णय घ्या असे मार्गदर्शन केल्याने नागपूर विभागीय उपाध्यक्ष मारोतीजी चेटुले यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 2/10/2022 रोज रविवार ला ग्रामपंचायत कार्यालय मानेगाव/सडक येथे जिल्हा सभा आयोजित करण्यात आली आणि सभेमध्ये जिल्हा कार्यकारणी नव्याने गठीत करण्यात आली .त्यामध्यें जिल्हा अध्यक्षपदी रूपेश वासुदेव बोरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर जिल्हा उपाध्यक्ष पदी मारोती चेटुले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर जिल्हा सचिव पदी शरद शामराव कायते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच मार्गदर्शक म्हणून हेमराजजी वाघाडे यांची निवड करण्यात आली. राजेशजी दिवटे सहसचिव ,देवेंद्र लांजेवार संघटक प्रसिद्धी ,सौ. माहेश्वरी फंदे महिला संघटक, खालील सदस्य गण = आनंदराव पेलने, सिताराम खंडाईत, दिलीप हाडगे, ज्ञानेश्वर मेश्राम, कैलास नान्हे, ,
धनराज शहारे, हिरालाल बारापात्रे,सौ. उषा घाटोळे तसेच तुमसर तालुका अध्यक्ष सचिव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button