जिल्हा

पठाण इम्रान ,,पोलीस की आवाज न्यूज ,भक्ती हीच सामाजिक शक्ती ! _ अशोक दादा गरूड साडेतीनशे किलोमीटर पायी प्रवास करून ज्योत घेऊन आलेल्या भाविकांचा भराडी येथे भव्य सत्कारँ

भराड़ी : अशोकदादा गरुड़ शैक्षणिक व सामाजिक समूह अंतर्गत भराड़ी येथील ज्ञानविकास प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात माहुरगडाहुन (जिल्हा नांदेड़ ) पिशोरला पायी ज्योत घेवून येणाऱ्या तरुण भाविकांच्या सत्कार आणि, प्रसादाचे आयोजन करण्यात आले .

    माहुरगड ते पिशोर हे साडे तिनशे किलोमीटर आहे . अंतर अविरत, अखंड ज्योत सह सलग पाच वर्षापासून पायी अनवाणी प्रवास करत येणाऱ्या या भाविकांचे जोरदार स्वागत करप्यात आले
           यावेळी  अशोकदादा गरुड़ यांनी भक्तां सोबत संवाद साधला . ते म्हणाले की, प्रत्येक धार्मिक रूढ़ि परंपरेला आध्यात्मिक बाबिची जोड़ असते. त्यात | विज्ञान असते. त्याला डोळसपने पाहने गरजेचे. भक्ती ही सामाजिक शक्ती असून तीचा वापर विधायक कार्यासाठी करण्यासाठी असे उपक्रम आवश्यक असतात . यामधे नैतीकता, निर्व्यसनिपणा, परिश्रम, निसर्गप्रेम , असे सद्गुण आपोआप विकासित होतात .
           पिशोर येथील हे तरुण  घटस्थापना व नवरात्र उत्सवाच्या अगोदर ज्योत आणून घटस्थापना करण्याच्या उद्देशाने माहुरगड गेले होते. कुठलेही कठिण कार्य मनात ध्यास असेल तर सहज़ पणे पार करता येते. परंतु त्यासाठी दृढ इच्छाशक्ति शिवाय हे शक्य नाही. आज या तरुणानी 350 किमी पायी अंतर अविरत ज्योत पेटती ठेवत पार केले. 
              या भाविकामध्ये चेतन कोल्हे , राहुल मोकासे, संतोष खडके, निलेश नवले, सुभाष कोल्हे, गणेश मोकासे, नितीन सपकाळ, अरूण निकम,  बबलू वाघ, सुरेश सपकाळ, संतोष मोकासे,गोरख मोकासे, विनोद नवले, कृष्णा कोल्हे, संतोष कोल्हे, आकाश कोल्हे, गोपाल कोल्हे, सोनू सुरडकर, शुभम देवकर, चिंटू मोकासे, समाधान नवले, दिपक कोल्हे, प्रशांत नवले, गणेश कोल्हे, बापू कोल्हे, सुमित कोल्हे, अतुल नवले, रोहीत पायघन, सुधाकर कोल्हे, गणेश मोकाशे , बबलू मोकासे, ज्ञानेश्वर कोल्हे, ज्ञानेश्वर नवले, सुनिल खडके, बारकू खडके, गणेश खडके, रोहीत सपकाळ, अनिल खडके, बंडू हिंजे , दिपक मोकासे, राजू नवले , ज्ञानेश्वर खडके, सचिन नवले, ज्ञानेश्वर जाधव, गोपाल राऊत, शंकर नवले, धनंजय डहाके, ऋषी कोल्हे, अविनाश नवले, दादू मोकासे, अभिषेक आहेर , सचिन नवले, बबलू नवले, भुषण राऊत, करण नवले, नितीन नवले, मनोज कोल्हे, गणेश मोकासे, प्रशांत खडके, विलास मोकासे, बापू मोकासे, संभाजी नवले , ज्ञानेश्वर ठाकूर , विलास नवले, पिंटू हिंजे, राजू नवले, प्रविण डहाके, कैलास मोकासे, सुभाष डहाके, सचिन पायघन , रवि नवले, भुषण कोल्हे आदि भक्तानी माहोर जिल्हा नांदेड़ येथून अखंड पायी चालून ज्योत आणल्या बददल माजी सभापती अशोकदादा गरुड़, बालब्रम्हचारी वीद्यानंद महाराज, नारायण खोमने, अमोल शेळके यांच्या हस्ते भक्त तरुणाचा सन्मान करण्यात आला. यावेळी सागर पवार, संदीप देशमुख, पांडुरंग महाजन, गणेश खोमने, इमरान पठान यासह ज्ञानविकास विद्यालयाचे मुख्याध्यापक, सहशिक्षक, शालेय वाहन चालक मालक यांची उपस्थिती होती.

पठान ईम्रान संवाददाता भराडी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button