वाघाच्या हल्यात एक व्यक्ती ठार




*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क जंगल वार्ता* मिळालेल्या माहितीनुसार वडसा(देसाईगंज)वनविभागा अंतर्गत येणारा उसेगावाजवडील जंगलात गेलेल्या एक ईसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज सकाळी 8.30 वाजे. दरम्यान घडली.वाघाच्या हल्यात ठार झालेल्या व्यक्ती चे नाव प्रेमलाल तुकाराम प्रधान वय45वर्षे असुन उसेगाव येथील रहिवासी आहे.
सविस्तर व्रुत्त असे की गावातील गणेशोत्सव मंडळ च्या माईक मध्ये वन विभागाकडून वाघाची जंगलात धुमाकुळ असल्याची माहिती दिली .तरी म्रुतकाने ही मुनादी ऐकून सुध्दा घरातील काड्या आणि झाळनी बणवण्याच्या मोहापायी जंगलात जातांनी वाघाने अचानक पणे झडप घालून त्याला जागीच ठार केले.
शुल्लक कामाकरिता जंगलात जाणाऱ्या उत्साही लोकांनी न सोडल्याने अशी घटना घटत असल्याची माहिती वन विभागाच्या सुत्रांनी दिली.
वन विभागामार्फत वाघाची शोधमोहीम करुन लोकांचा कसा रक्षण करता येईल यासाठी उपाययोजना करित आहेत.




