तलावात बुडून 12 वर्षीय विद्यार्थांचा मृत्यू

भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क//चँनल
पोलीस कि आवाज
संजीव भांबोरे
भंडारा( ऑल इंडिया प्रतिनिधी).तुमसर पासुन चार किलोमिटर अंतरावर असलेल्या हसारा गावातील 12 वर्षिय विद्यार्थांचा शाळेजवळील तलावात बुडुन मृत्यु.
सविस्तर वृत्त असे कि हसारा येथील जि.प.च्या शाळेत 5 व्या वर्गात शिकत असलेला देवेंद्र अजय बोंद्रे हा विद्यार्थी दहा वाजता शाळेत गेला होता.शाळेतील मधल्या सुट्टीत जेवून वैगरे करुन आपल्या मित्रांसोबत शाळेलगतच असलेल्या गावातील तलावाकडे दोन तिन मित्रांसह खेळायला गेले असता .तलावातील पाळीवरून पाय घसरून तलावात पडला .सोबत असलेल्या विद्यार्थांनी लगेच आरडा ओरड करत गावात येऊन सांगितले .गावातील नागरिक व घरच्या मंडळिंनी लगेच तलावाकडे धाव घेतली व देवेंद्रला तलावातुन काढले तेव्हा थोडा स्वास सुरु असल्याने लगेच त्याला तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले परंतु तो पर्यंत प्राण पखेरु उडुन गेले होते. सदर (घटना दुपारी दोन वाजताच्या दरम्यान घडली असुन ), डाक्टरांनी तपासणी केले असता मृत पावल्याचे सांगताच घरच्या मंडळींनी हंबरडा फोडला.देवेंद्र हा मामा रामु हिंगे यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी आला होता.तसा तो निलज येथील रहिवासी असुन मामाकडे राहुन शिक्षण घेत होता .त्यांच्या अशा अकाली निधनाने हसारा गावात हळहळ व्यक्त होत असुन गावात शोककळा पसरली आहे.
