बेला येथे अवैध दारू विक्री जोमात
(पोलीस प्रशासनाचे अवैध धंद्यांना अभय; नागरिक त्रस्त)

भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क//चँनल
पोलीस कि आवाज
संजीव भांबोरे
भंडारा( ऑल इंडिया प्रतिनिधी)- शहरालगत असणाऱ्या बेला या गावात पोलीस खात्याच्या आशीर्वादाने अवैध मोहफुल दारू विक्री जोरात सुरू आहे.
बेला येथील सौ. सुवर्णा गोस्वामी ह्या दवडीपार रोडवरील आपल्या राहत्या घरी सर्रास अवैध मोहफुल दारू विक्री करत आहेत. त्यांच्या घरासमोरील मुख्य रस्त्यावरून शालेय विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी सतत अवागमन करत असतात.
सदर परिसरातील स्थानिक नागरिक तसेच विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी यांना या परिसरात अनेकवेळा मद्यपींपासून होणाऱ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पोलीस प्रशासनाच्या डोळेझाक वृत्तीमुळे सामान्य नागरिकांना अवैध धंद्यांपासून नाहक त्रास सहन करावा लागत आहे; त्यामुळे पोलीस प्रशासनाविरोधात स्थानिक नागरिकांत तीव्र संताप दिसून येत आहे. स्थानिक नागरिकांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्याचा मानस असल्याची माहिती काही विद्यार्थी तसेच प्रतिष्ठित नागरिकांनी दिली आहे. नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक हे तरी आता अवैध धंद्यांना आवर घालतील का याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
