हसाराटोली येथील चोरीला गेलेली बुद्धांची मूर्ती पोलिसांनी चोरट्या कडून हस्तगत


तुमसर पोलिसांचे यश
विधी संघर्षग्रस्त बालकास अटक
भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क//चँनल
पोलीस कि आवाज
संजीव भांबोरे//राजेश ऊके(मुख्य संपादक)
भंडारा (ऑल इंडिया प्रतिनिधी) तुमसर लगतच्या हसाराटोली येथील बुध्द विहारात पितळेची एक ते सव्वा फूट उंचीची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना दी.१६ ऑगस्ट रोजी उघडकीस आली दरम्यान घटनेची दखल घेत तुमसर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवताच त्या घटनेत एका विधी संघर्षग्रस्त बालकास अटक करून त्याच्या कडून चोरी केलेली बुद्धांची मूर्ती हस्तगत केली.
हसारा टोली येथील बुध्द विहारात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेकर व गौतम बुद्ध यांचे दगडाचे मुर्तीचे मधोमध एक ते सव्वा फूट उंचीची पितळे ची बुद्ध मूर्ती चिटकवून ठेवलेली होती. दी. १६ ऑगस्ट रोजी सायकळी ७:०० दरम्यान संजू धनराज चौरे ह्या महिला वंदना करण्यास विहारात गेले असता तिथे ती दान मिळालेली पितळेची मूर्ती दिसली नाही त्यामुळे त्यांनी
आजूबाजुला चौकशी केली असता मूर्ती बाबद काहीच माहिती मिळाली नसल्याने लागलीच तुमसर पोलिसांत तक्रार दाखल केली. घटनेची गंभीरता लक्षात घेत पोलीस निरीक्षक यांनी भादवी चे कलम ३८० नुसार गुन्हा दाखल करून तपासात घेतला दरम्यान आज दीं. २२ ऑगस्ट रोजी एका विधी संघर्षग्रस्त बालकास अटक करून त्याच्या कडून ती चोरी ला गेलेली मूर्ती त्याच्या कडून हस्तगत केली असून पुढील तपास
पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनात डि.बी पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजयकुमार टेकाम, पो हवा रितेश बर्वे, संजय गर्जे मंगेश गेडाम, राकेश पटले व परिमल हे करीत आहेत.
