Uncategorized

अबाधा फाऊंडेशन च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शिवणकाम सौंदर्य प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देण्यात आले.

पोलीस कि आवाज विशेष वार्तादिनांक १२ ऑगस्ट २०२२ रोज शुक्रवार ला अबाधा फाऊंडेशन, तुमसरच्या वतीने स्थळ राजाराम सभागृह तुमसर येथे संस्थेचे सहावे वर्धापन दिन साजरे करण्यात आले असून त्या ezअंतर्गत सत्कार समारंभ सोहळा संपन्न झाला. सदर सोहळ्याचे दोन सत्र असून प्रथम सत्राला सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असुन द्वितीय सत्राला सत्कार समारंभाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तरी कार्यक्रमाचे उद्घाटक मा. हिरालालजी नागपुरे (उपसभापती प. स. तुमसर) हे होते तर अध्यक्षिय स्थान मा. संदीपजी ताले (उपाध्यक्ष जि. प. भंडारा) यांनी भूषविले होते. त्याचबरोबर मा. हिम्मतलालजी पारधी (संपादक मराठी दैनिक लोकजन), मा. ब्रिजलालजी पटले (सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक), मा. डॉ. भजणकर सर, मा. बारस्कर सर, मा. शाहा सर (मुख्या. हरदोली आं.), मा. गुड्डूजी पटले (शा. व्य. स. अध्यक्ष हरदोली), मा. गायधने मॅडम (समुपदेशक, पो. स्टेशन, तुमसर), मा. उरकुडे मॅडम, मा. माधूरीताई पटले (व्यवस्थापकीय संचालिका, अबाधा फाऊंडेशन,तुमसर) यांनी प्रमुख पाहुणे म्हणून स्थान ग्रहण केले होते. लगेच दुसऱ्या सत्रामध्ये मा. शिशुपालजी पटले (माजी खासदार) हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते तर मा. प्रदीपजी पडोळे (माजी नगराध्यक्ष न. प. तुमसर) हे अध्यक्ष होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. राजुजी कारेमोरे (आमदार तुमसर/मोहाडी विधानसभा क्षेत्र), मा. झुरमुरे सर (प. स. सदस्य), मा. गीताताई कोंडेवार (माजी उपाध्यक्षा न. प. तुमसर), मा. तीतिरमारे सर, मा. माधुरीताई पटले (व्यवस्थापकीय संचालिका अबाधा फाउंडेशन तुमसर) हे लाभले होते. यामध्ये सत्र २०१६-१७ ते २०२१-२२ पर्यंत गुणवंत विद्यार्थ्यांचे ट्रॉफी देऊन तर शिवणकाम व सौंदर्य प्रशिक्षनार्थ्यांचे प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

स्वार्थी करमकार
न्यूज रिपोर्टर
महिला प्रतिनिधी
पोलिस की आवाज न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button