Uncategorized

देशाच्या संरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार -कमांडंट लवकुमार ( पीएमजी)

नूतन कन्या च्या विद्यार्थीनींनी बांधल्या सैनिकांना राख्या

भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क//चँनल
★पोलीस कि आवाज★
संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी):- भारतीय सीमेवर डोळ्यात तेल घालून जनतेचे संरक्षण करण्यासाठी सदैव तैनात असलेल्या आम्हा सैनिकांना “धागा शौर्य का राखी अभिमान की” या उपक्रमाअंतर्गत गेल्या पाच वर्षापासुन नूतन कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयासह अनेक विद्यालय व महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी स्वत: राख्या तयार करत पत्र रूपी संदेश पाठविण्याचा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर यांच्या संकल्पनेतून २०६ कोबरा बटालियनच्या सैनिकांना राख्या बांधून सामाजिक बांधिलकी जोपासत आमचा मनोबल वाढविला आहे. त्याकरिता देशाच्या संरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असे प्रतिपादन २०६ कोबरा चे कमांडंट श्री. लवकुमार (पीएमजी) यांनी केले.
ते भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कोबरा बटालियन २०६ चितापुर येथे रक्षाबंधना निमित्ताने विद्यार्थीनींनी स्वत: राखी व संदेश पत्राला उत्तर देत बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी २०६ कोबरा चे (पीएमजी) कमांडंट श्री. लवकुमार, व्दितीय कमान अधिकारी इथापे पंडित किसनराव, श्रीमती. प्रिती पंडित ईथापे,
डीसी रणजित मंडल, एसएमओ डॉ. भरत कुमार, एसएमओ
डॉ. स्पंदना, एसी मक्खन लाल, एसी जितेंदर, एसी एस.आर. शुभाकर, एसी साजील कुमार, एसी संकेत, नूतन कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सीमा चित्रिव, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, सामाजिक कार्यकर्ते यशवंत बिरे, महा सेतू केंद्राचे संचालक समीर नवाज, पर्यवेक्षक
कैलास कुरंजेकर, एनसीसी अधिकारी रश्मी मोहरकर, रामेश्वर आस्वले, उपस्थित होते.
त्यावेळी लिना साखरकर, विद्यार्थीनीं त्रिशा सपाटे, विद्यार्थीनी समिक्षा दोनाडकर यांनी सैनिकांना राखी बांधून औक्षवंत केले.
त्याप्रसंगी नूतन कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सीमा चित्रिव यांच्या संदेशासह अनेक विद्यार्थीनींनी सैनिकांना लिहलेल्या संदेशाचे वाचन असिस्टंट कमांडेट संकेत यांनी केले. राखी बांधत व संदेश वाचन करतांना अनेक सैनिकांचे डोळे पाणावले होते.
“धागा शौर्य का राखी अभिमान की” या उपक्रमाअंतर्गत गेल्या पाच वर्षापासुन नूतन कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, जिजामाता विद्यालय, महिला अध्यापक विद्यालय, तसेच जे. एम. पटेल महाविद्यालय भंडाराच्या विद्यार्थीनींनी स्वत: राख्या तयार करत पत्र रूपी संदेश पाठविण्याचा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर यांच्या संकल्पनेतून राबवित २०६ कोबरा बटालियनच्या सैनिकांना राख्या बांधून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कोबरा बटालियन २०६ चितापुर येथे रक्षाबंधना निमित्ताने चार विद्यालयातील विद्यार्थीनींनी स्वत: राखी व संदेश पत्र तयार केलेला बॉक्स विलास केसरकर यांनी २०६ कोबरा चे कमांडंट श्री. लवकुमार (पीएमजी), कमांडंट व
श्री ईथापे पंडित किसनराव, व्दितीय कमान अधिकारी यांना सुपुर्द केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नूतन कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, जिजामाता विद्यालय, महिला अध्यापक विद्यालय, तसेच जे. एम. पटेल महाविद्यालय भंडाराच्या शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थीनींनी व २०६ कोबरा बटालियनच्या सैनिकांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button