तुमसर चे माजी नगराध्यक्ष ईजी.प्रदिप पडोळे आणी मुन्ना भाऊ पुंडे यांच्या सोबत गावात जाऊन पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहनी केली.





भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क//चँनल
★●★पोलीस कि आवाज★●★
राजेश ऊके द्वारा प्रकाशित
वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे तुमसर तालुक्यातील नदिकाठी असलेल्या देवहाड़ा, माडगी,चारगांव, ढोरवाडा,सुकळी,या गावात पुराचे पानी शिरल्याने ,नदिकाठी असलेल्या गावातील भरपूर लोकांच्या घरात पानी शिरले व त्यांना पुराचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यातच भरपूर लोकांचे घर मातीचे असल्याने पडण्याच्या परिस्थितित आले आहेत या पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितिची पाहणी करण्याकरीता तुमसरचे माजी नगराध्यक्ष इंजी प्रदीपजी पडोळे यांनी आज मुन्नाभाऊ पुंडे यांच्या सोबत या गावात जाउंन पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली व गावातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या समस्याचे निराकरण करण्याकरीता प्रशासना कडून योग्य ति कारवाई करण्याकरिता सम्बंधित आधिकारि वर्गाशी मोबाईल वर सम्पर्क करून त्यांचा अडचणी दूर करण्याबाबत सूचना दिल्या व नुकसान झालेल्या गावकर्यांना त्वरित मदत करावी असे आव्हान केले या वेळी त्यांचा सोबत तुमसर तालुका भाजपा अध्यक्ष काशीरामजी टेम्भरे, अन्नू रोचवानी, संतोष वहिले, दिलीप बोन्द्रे,सुरेश ठवकर, पप्पू सेलोकर,संदीप कटकवार,शेखर मलेवार,बालू माटे,गणेश वंजारी, सोहन पटले, यांच्या सह भारतिय जनता पार्टी चे पदाधिकारी व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते
