छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान तुमसर च्या वतीने कारगिल विजय दिवस साजरा
भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क /चँनल
पोलीस कि आवाज
कारगिल विजय दिवस हा देशासाठी अभिमानाचा दिवस असून या युद्धात शहीद झालेल्या तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी. कारगिल युद्धात बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती व त्यांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. देशासह देशवासियांचे संरक्षण करण्यासाठी सीमेवर सैनिक अहोरात्र पहारा देत असतात. त्यावेळी आपले सैनिक स्वत:सह कुटुंबाचाही विचार करीत नाही, फक्त देशाचाच विचार करतात. देशासाठी प्राणार्पण केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासह त्यांची जबाबदारी उचलणे हे आपले सामाजिक कर्तव्यच आहे. याची जाण प्रत्येकाला असणे तेवढेच महत्त्वाचे या उदात्त भावनेचे स्मरण ठेवत छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान तुमसर च्या वतीने कारगिल चौक माकडे नगर तुमसर येथील कारगिल स्मारकाला भेट देऊन व वीर जवानांना स्मरण करून हुतात्मा स्मारकाला माल्यार्पण व असंख्य दीप प्रज्वलन करून मानवंदना देण्यात आली यावेळी छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान तुमसर चे संस्थापक /अध्यक्ष इंजि. नितीन धांडे प्रतिष्ठानचे सचिव प्रा. अमोल उमरकर कोषाध्यक्ष प्रतीक बुधे , संपर्कप्रमुख कोमल वानखेडे, प्रतिष्ठानचे निष्ठावंत मावळे प्रशांत वासनिक, नितीन सार्वे इत्यादींच्या उपस्थितीत व रिटायर्ड इंडियन आर्मी कमांडो व कारगिल युद्धात महत्वाचे योगदान देणारे श्री राजीक शेख यांच्या नेतृत्वाखाली प्रस्तुत कार्यक्रम पार पडला.
स्वार्थी करमकर
महिला न्यूज रिपोर्टर
पोलिस की आवाज


