नवीन संसद भवनावर बसविण्यात आलेले राजमुद्रा ,मानचिन्ह पूर्वीप्रमाणेच ठेवा- सम्राट अशोक सेनेची राष्ट्रपती ,पंतप्रधान यांच्याकडे मागणी


भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क/चँनल
*पोलीस कि आवाज न्युज *
संजीव भांबोरे
भंडारा (ऑल इंडिया प्रतिनिधी) नवीन संसद भवनात शीर्ष स्थानी उभारण्यात आलेल्या राजमुद्रा ,राज चिन्ह यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेले आहे .परंतु मूळ राजमुद्रीत प्रतिकृती आताची प्रतिकृतीत बदल करण्यात आलेला आहे .तो दुरुस्त करण्यात यावा. याबाबतचे निवेदन भंडारा येथील जिल्हाधिकारी यांचे मार्फत भारताचे महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सम्राट अशोक सेनेने एका निवेदनाद्वारे केलेली आहे .सारनाथ येथे सम्राट अशोकाने उभारलेल्या चार सिंहाचे चिन्ह हे आपले राष्ट्रीय चिन्ह राजमुद्रा आहे .परंतु आता नव्याने बांधण्यात आलेल्या नवीन संसद भवनावर उभारण्यात आलेल्या राजमुद्रेतील सिंह हे मूळ अशोक स्तंभावरील सिंह पेक्षा वेगळे आहे. 1950 ला भारताने स्वीकारलेल्या प्रजासत्ताक राजमुद्रे वरील सिंह शांत ,संयमी, सुंदर, डौलदार ,धीरगंभीर, शालीन ,अर्थातच सामर्थ्यशाली आहे. नैतिकतेच्या राज्याचे प्रतीक म्हणून सम्राट अशोकाचे चिन्ह ओळखले जाते .त्या सिंहाच्या पायाशी असलेले चक्र हे नैतिकतेचे प्रतीक आहे. पण आता संसद भवनावर उभारण्यात आलेल्या सिंहाची प्रतिमा भीतीदायक, रागीट, हिंसेचे प्रतीक, आक्रमक, क्रूर धडकी भरवणाऱ्या उग्र आहेत .हा राष्ट्रीय चिन्हाच्या अपमान आहे. भारताच्या राजमुद्रेत कुठलाही बदल करणे हा भारतीय संविधानाचा अपमान आहे. व संविधान विरोधी आहे .हा अपमान कोणताही भारतीय नागरिक सहन करून घेणार नाही .त्यामुळे संसद भवनावर उभारण्यात आलेल्या राजमुद्रेत दुरुस्ती करून पूर्वीप्रमाणेच राष्ट्रीय राजमुद्रा मूळ अशोक स्तंभ स्वरूपात बसविण्यात यावी .अशी मागणी सम्राट अशोक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तुळशीराम गेडाम, सम्राट अशोक सेनेचे राष्ट्रीय महासचिव संजीव भांबोरे ,तुकड रामटेके ,निखिल पाणबुडे, डॉ .अमृत बांडेबुचे ,अमरकंठ बांडेबुचे ,सुनील डहारे ,जनार्दन सुखदेवे,आशिष पडोळे, शंकर मस्के ,शिवदास डहारे ,भीमशंकर गजभिये हरिदास रामटेके ,निखिल पानबुडे ,यांनी एका निवेदनाद्वारे राष्ट्रपती ,पंतप्रधान यांच्याकडे केलेली.
