रवी हलमारे यांना पाणी वाटप पदावरून तात्काळ बरखास्त करा -याकरिता बसपाचे खंडविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन

भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क/चँनल
संजीव भांबोरे
भंडारा (ऑल इंडिया प्रतिनिधी) लाखनी तालुक्यातील रवी शालिक हलमारे रा.सेलोटी ह्यांना पाणी वाटप विभागातील पदावरून बडतर्फ करण्यात यावे याबाबतचे निवेदन खंडविकास अधिकारी लाखनी ,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांना बहुजन समाज पार्टीच्या वतीने देण्यात आले ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पाणी वाटप विभागामध्ये कार्यरत असलेले रवि शालिक हलमारे याच्यावर कलम 354 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. मागील काही दिवसांपूर्वी रवि शालिक हलमारे, हे (विश्वजित कुसोबा गणवीर) यांच्या राहत्या घरी बाथरूम मधील मेजरमेन्ट घेण्याकरिता आला असता, त्याने (प्रीती विश्वजित गणवीर) सोबत छेडखानी केली. सदर घटनेची तक्रार पोलीस स्टेशन लाखनी ला नोंदविली असून, रवि शालिक हलमारे याच्यावर भारतीय दंड साहिता 1860 च्या कलम 354 (अ), 509, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 च्या कलम 3(1)(w)(i)(ii), 3(2)(va) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवि शालिक हलमारे हा व्यक्ती संपूर्ण गावामध्ये पाणीचे(नळाचे) बिल वितरित करण्याकरिता फिरत(घरोघरी जात) असतो, आणि त्यामुळे अश्या प्रकारची घटना कुणासोबतही घडू शकते, ह्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर व्यक्ती हा दूषित मानसिकतेचा असून, ह्यापूर्वी सुद्धा असे प्रकरण घडले असल्याची जनमानसात चर्चा आहे. ह्यामुळे गावातील वातावरण बिघडण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.
तरी, आपणास ह्या पत्राद्वारे नम्र विनंती करतो की, रवि शालिक हलमारे, ह्याला पाणी वाटप विभागात कार्यरत असलेल्या पद व नोकरीवरून त्वरित बडतर्फ करण्यात यावे.
येत्या 3 दिवसांत, सदर व्यक्ती (रवि शालिक हलमारे) ला बडतर्फ करण्यात आले नाही, तर आपल्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल.

