भंडारा येथील वेतन पथक अधिक्षक प्रतिभा मेश्राम यांचेवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

पंकज वानखेडे :::
पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क ::::
भंडारा जिल्ह्यात येथील माध्यमिक शिक्षण विभागाचे वेतन व भविष्य निर्वाह पथक येथील अधिक्षक वर्ग २ प्रतिभा लक्ष्मण मेश्राम (४८) यांना देयक काढण्यासाठी भंडारा शहरातील एका सेवानिवृत्त कर्मचारी यांचेकडून ३५०० रुपयाची लाच घेतांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.
विशेष म्हणजे अधिक्षक प्रतिभा मेश्राम यांचेवर एसीबीने कारवाई केल्यानंतर शिक्षकांकडून एससीबीचे अभिनंदन करण्यात येत आहे. प्रतिभा मेश्राम यांच्या विरोधात दोन वर्षापासून विविध शिक्षक संघटनांकडून आंदोलन करण्यात येत होते. त्यांच्याविरोधात शिक्षण विभागाने चोकशी समिती नेमली होती. कार्यालयात मटन पार्टीचा विषय राज्यात गाजला होता. त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या विरोधात तक्रार केली होती.
श्रीमती प्रतिभा लक्ष्मण मेश्राम अधिक्षक, वेतन भविष्य वेतन निर्वाह निधी पथक, माध्यमिक, जिल्हा परिषद विभाग भंडारा यांनी तक्रारदार पुरुष 58 वर्षे हा कनिष्ठ लिपिक या पदावरून सेवानिवृत्त झाला असून त्याचे अर्जित रजा रोखीकरणाचे मोबदला रक्कम मिळणेकरिता देयक त्याने अधीक्षक, वेतन पथक, शिक्षण विभाग माध्यमिक, भंडारा यांच्या कार्यालयात मंजुरी करीता सादर केलेले असता मंजुर करून देयकाची रक्कम अदा करण्यासाठी कोषागार येथे पाठविण्याच्या मोबदल्यात 3500/- रुपयांच्या लाचेची मागणी करून ती रक्कम पंचासमक्ष तिचेच कार्यालयात स्वीकारली.
सदर कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर,
मधुकर गिते, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर, महेश चाटे, पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि, भंडारा यांचे मार्गदर्शनात तपासी अधिकारी अमित डहारे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. भंडारा यांनी केली. सापळा कारवाई पथकात अमित डहारे पोलीस निरीक्षक , सहाय्यक फौजदार संजय कुरंजकर, पोलीस नायक अंकुश गाढवे, पोलीस अंमलदार चेतन पोटे, विष्णू वरठी, कुणाल कडवं, राजकुमार लेंडे, विवेक रणदिवे, म.पो.शि. अभिलाषा गजभिये, चा.ना.पो.शि. दिनेश धार्मिक सर्व ला.प्र.वि. भंडारा यांचा समावेश होता.
==================
भंडारा जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो, भंडारा
दुरध्वनी 07184-252661
पोलिस उप अधीक्षक श्री. महेश चाटे
मो.क्र.- 9823408344
पोलिस निरीक्षक, कमलेश सोनटक्के
मोबाईल 9422644538
श्री. अमित डहारे, पोलीस निरीक्षक
मोबाईल 09823240129
@ टोल फ्रि क्रं. 1064

